अंबाजोगाई : नृत्याची आवड असलेल्या एका तरुणीला कलाकेंद्रात काम देण्याचे आणि पैसे मिळवून देण्याचे आमिष दाखवून अंबाजोगाई येथे आणून तिच्यावर पाशवी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पीडितेच्या आईने बारामती तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, एका महिलेसह चारजणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या घटनेमुळे बारामतीसह बीड जिल्हा हादरला आहे. कलाकेंद्रांच्या नावाखाली सुरू असलेल्या अशा अनैतिक कृत्यांवर संताप व्यक्त होत आहे.
बारामती येथील महिलेच्या फिर्यादीनुसार, तिच्या मुलीस नृत्य आणि गायनाची आवड होती. २४ एप्रिल २०२५ रोजी अंबाजोगाई येथील बदामबाई गोकुळ नावाच्या महिलेने फिर्यादीशी संपर्क साधला. आपल्या कलाकेंद्रात नृत्यासाठी मुलींची गरज असून, मुलीला पाठवल्यास ती नृत्य शिकेल आणि तिला पैसेही मिळतील, असे आमिष बदामबाईने दाखविले. फिर्यादीच्या मुलीला अंबाजोगाई येथील पायल कलाकेंद्र येथे नेले असता तिने तिथे राहण्यास नकार दिला. त्यानंतर बदामबाई आणि इतर दोघांनी पीडितेला बेदम मारहाण केली. नंतर पीडितेला जबरदस्तीने अंबाजोगाई येथील साई लॉजवर नेऊन बदामबाईने पीडितेला मनोज कालिया, प्रमोद गायकवाड आणि एका अज्ञात व्यक्तीच्या ताब्यात दिले. या तिघांनी पीडितेवर आळीपाळीने सामूहिक बलात्कार करून तिचे अमानुष हाल केले. नंतर तिला पुन्हा पायल कलाकेंद्र येथे आणून सोडले. नंतर वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न झाला. पीडितेने कसेबसे आपल्या आईशी फोनवर संपर्क साधून घडलेला भयंकर प्रकार सांगितला. घाबरलेल्या आईने तातडीने अंबाजोगाई गाठून मुलीची सुटका करून तिला बारामतीला आणले. नंतर पीडितेच्या आईने बारामती तालुका पोलिस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी बदामबाई गोकुळ, मनोज कालिया, प्रमोद गायकवाड आणि एका अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा आता अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांकडे वर्ग करण्यात आला असून, पिंक पथकातील एपीआय जाधवर यांच्याकडे तपास आहे.
अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांची उदासीनता?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अत्याचाराच्या संदर्भात गुन्हा दाखल करण्यासाठी फिर्यादी सुरुवातीला अंबाजोगाई ग्रामीण पोलिस ठाणे गाठले होते. मात्र, पोलिसांनी दुर्लक्ष करत गुन्हा नोंदवून घेतला नाही. अखेर पीडित मुलीच्या आईने बारामती पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांनी गुन्हा का दाखल करून घेतला नाही, याबद्दल उलटसुलट चर्चा होऊ लागल्या आहेत.
Web Summary : A young woman, lured with a job in a cultural center in Ambajogai, was gang-raped. Police have registered a case against four individuals, including a woman, following the victim's mother's complaint. Initial police reluctance to register the case is being questioned.
Web Summary : अंबाजोगाई में एक सांस्कृतिक केंद्र में नौकरी का लालच देकर एक युवती से सामूहिक बलात्कार किया गया। पीड़िता की मां की शिकायत के बाद पुलिस ने एक महिला सहित चार लोगों के खिलाफ मामला दर्ज किया है। पुलिस द्वारा मामला दर्ज करने में शुरुआती अनिच्छा पर सवाल उठाए जा रहे हैं।