शहरं
Join us  
Trending Stories
1
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
2
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
3
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
4
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
5
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
6
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
7
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल
8
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
9
भारत, पाकिस्तान, अमेरिका अन् जपानमध्ये आपत्ती येणार; बाबा वेंगाची 'ती' भविष्यवाणी खरी होणार?
10
ATM मधून पैसे काढताना तुम्हीही दोनदा Cancel बटन दाबता का? खरंच कामाची आहे का ही ट्रिक
11
VIRAL : खोदकाम करताना सापडलं १९९७चं जलजीऱ्याचं पाकिट; पण सोशल मीडियावर का होतंय व्हायरल?
12
“...तोपर्यंत मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मिळणार नाही”: बाळासाहेब थोरात
13
BCCI नं श्रेयस अय्यरला दिलं कॅप्टन्सीचं गिफ्ट; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ
14
'तो खोटं बोलला, हॉटेलमध्ये जाताच त्याने माझी...'; विधवा सासूने जावयावर केला खळबळजनक आरोप
15
“आज BJP आहे, उद्या बाजी पलटेल, काँग्रेस सत्तेत येईल”; कोणत्या नेत्यांनी व्यक्त केला विश्वास?
16
५०० वर्षांनी चंद्रग्रहणात शुभ योग: ५ राशींचे पंचक सुटेल, लाभ मिळेल; ४ राशींनी सावध राहावे!
17
मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ‘हिट’, शेतकरी, धारावी पुनर्वसन आंदोलन याच मार्गाने जाणार?
18
Raja Raghuvanshi : कट, खून अन् पुरावे... मेघालय पोलिसांनी तब्बल ७९० पानांमध्ये नोंदवला सोनम रघुवंशी आणि राजचा गुन्हा!
19
जीएसटी कपातीमुळे कुटुंबाच्या मासिक खर्चात होणार बचत; पण वाचलेल्या पैशांची कुठे, कशी गुंतवणूक कराल?
20
रश्मिका मंदानाने घातली डायमंड रिंग, विजय देवरकोंडाशी झाला साखरपुडा? चर्चांना उधाण

सुनेविरोधात कोर्टातून सोडचिठ्ठी मिळवून देण्याचे आमिष; शेतकऱ्याकडून ६ लाख लुटले, तोतया वकील महिलेस अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 13:44 IST

आरोपीने अशिक्षित व अडाणीपणाचा गैरफायदा घेऊन शेतकऱ्याला वकील असल्याचे खोटे सांगून दिशाभूल केली

लोणी काळभोर : वयोवृद्ध शेतकऱ्याच्या सुनेविरोधात कोर्टातून सोडचिठ्ठी मिळवून देण्याचे आमिष दाखवून शेतकऱ्याकडून सुमारे ६ लाख लुटणाऱ्या बोगस महिला वकिलाला लोणी काळभोरपोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई पोलिसांनी लोणी काळभोर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत बुधवारी (दि. २८) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास केली आहे.स्नेहल हरिश्चंद्र कांबळे (वय ३२, रा. लोणी काळभोर ता. हवेली जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी कडु बाबुराव सातपुते (वय. ६३, रा. दहिगाव माळी गल्ली, ता. शेवगाव जि. अहिल्यानगर) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कडु सातपुते हे दहिगाव माळी येथे कुटुंबासोबत राहतात. ते शेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. दरम्यान त्यांच्या एका मुलाचा विवाह झाला होता. तेव्हा त्यांचा मुलगा आणि सुनेची नेहमी भांडणे होत होती. त्यामुळे फिर्यादी यांना त्यांच्या मुलासाठी सुनेकडून सोडचिठ्ठी करून घ्यायची होती. दरम्यान, आरोपी स्नेहल कांबळे हिने फिर्यादी यांच्या अशिक्षित व अडाणीपणाचा गैरफायदा घेऊन त्यांना वकील असल्याचे खोटे सांगून दिशाभूल केली. तसेच तिने सातपुते यांना कोर्टात त्यांची सुन सुरेखा यांच्यापासून सोडचिठ्ठी घेऊन देण्याचे आमिष दाखविले. फिर्यादी यांच्याकडून वेळोवेळी रोख व बँक खात्यावर पैसे घेऊन, सोडचिठ्ठी करुन न देता त्यांची आर्थिक फसवणुक केली आहे. सदर प्रकार हा २४ एप्रिल २०२५ ते २८ मे २०२५ या कालावधीत घडला आहे.आरोपी स्नेहल कांबळे हिने कडु सातपुते यांना त्यांच्याविरुद्ध त्यांच्या सुनेने बलात्काराचा व मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच तीने महिला आयोगाकडेही तक्रार केली आहे, असे खोटे कारणं सांगून त्यांच्याकडून पोलीस व कोर्ट कर्मचारी यांना पैसे द्यावे लागतील, नाहीतर त्यांना अटक होईल, अशी खोटी माहिती देवुन त्यांना वेळोवेळी अटकेची भिती दाखविली. त्यानंतर त्यांच्याकडून वेळोवेळी ऑनलाईन व रोख स्वरुपात एकुण ५ लाख ९४ हजार ६० रुपये रक्कम खंडणी स्वरुपात स्वीकारली आहे.

दरम्यान, कडु सातपुते यांनी याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार पोलिसांनी लोणी काळभोर (ता. हवेली) ग्रामपंचायतीच्या गाळ्यांच्या परिसरात सापळा रचला होता. तेव्हा कडु सातपुते यांच्याकडून १५ हजार रुपयांची खंडणी स्वीकारताना स्नेहल कांबळे यांना रंगेहाथ पकडण्यात आला आहे. त्यांच्यावर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कामगिरी पुणे शहर पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे,सहाय्यक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र  पन्हाळे, पोलीस उपनिरीक्षक रत्नदीप  बिराजदार, पूजा माळी, पोलिस हवालदार ज्योती नवले, पोलिस अंमलदार अजिंक्य जोजारे, मंगेश नानापुरे, संदीप धुमाळ व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली आहे.

टॅग्स :PuneपुणेLoni Kalbhorलोणी काळभोरPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीFarmerशेतकरीfraudधोकेबाजी