शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
2
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
3
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
4
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
5
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
6
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
7
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
8
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
9
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
10
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
11
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
12
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
13
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
14
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
15
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
16
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
17
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
18
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
19
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
20
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"

बारामती येथील बनावट रेमडेसिविर प्रकरणातील आरोपींचा जामीन फेटाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2021 7:09 PM

बारामती येथील बनावट रेमडेसिवीर प्रकरणातील टोळीने पॅरासिटीमॉलचे पाणी रेमिडेसिविरच्या मोकळ्या इंजेक्शनमध्ये भरून विकले होते. यात एका रुग्णाचा मृत्यू झाला होता.

बारामती : बारामती येथील बनावट रेमडेसिवीर प्रकरणातील आरोपींचा जामीन बारामती जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. या टोळीने पॅरासिटीमॉलचे पाणी रेमिडेसिविरच्या मोकळ्या इंजेक्शनमध्ये भरून विकले होते. यात एका रुग्णाचा मृत्यू झाला होता. त्यावरून सापळा रचून बारामती ग्रामीण पोलिसांनी या टोळीला एका डॉक्टरसह ताब्यात घेतले होते. आरोपींनी जामिनासाठी केलेला अर्ज गुरूवारी (दि. ५) बारामतीच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळला. 

या प्रकरणातील प्रशांत घरत, दिलीप गायकवाड, शंकर दादा भिसे या तीन आरोपींनी जामिनासाठी अर्ज केला होता. न्यायाधीश एस.टी. भालेराव यांच्यासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. सरकार पक्षाच्या वतीने सरकारी वकील अ‍ॅड. ज्ञानदेव शिंगाडे यांनी सरकारची बाजू मांडताना या गुन्ह्यात एका निरपराध रुग्णाचा मृत्यू झाला असल्याने यातील आरोपींना जामीन देऊ नये असा युक्तिवाद करण्यात आला होता. दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायाधीशांनी या तिघांचा जामीन अर्ज फेटाळला.

तीन महिन्यांपूर्वी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये सर्वत्र हाहा:कार माजवला होता. याच दरम्यान रूग्णांच्या नातेवाईकांना रेमडेसिवीर मिळवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत होती. नातेवाईकांच्या हतबलतेचा फायदा घेत आरोपींनी रेमडेसिवीरच्या मोकळ्या झालेल्या बाटल्यांमध्ये पॅरासिटीमॉलचे पाणी भरून भरमसाठ किमतीला विकले जात होते. बारामती ग्रामीण पोलिसांनी बनावट रेमडेसिविर इंजेक्शन तयार करुन विकणारी टोळी रंगेहाथ पकडली होती. पोलिसांनी त्यासाठी 'स्टिंग ऑपरेशन' राबविले होते. कोरोना संकट काळात रेमडेसिविरची मोठ्या प्रमाणात मागणी असताना या टोळीने पॅरासिटोमॉल गोळ्यांचे पाणी तयार करत ते कुपीत भरून विकण्याचा धंदा सुरु केला होता. ३० ते ३५ हजार रुपयांना एक इंजेक्शन विकले जात असल्याची माहिती पोलीस चौकशीत पुढे आली होती. या बनावट इंजेक्शनमुळे पवारवाडी (ता. फलटण) येथील स्वप्निल जाधव या कोरोनाबाधिताला आपला जीव गमवावा लागला होता. 

या प्रकरणात काटेवाडीजवळील मासाळवाडी येथील दिलीप ज्ञानदेव गायकवाड याच्यासह प्रशांत घरत (रा. भवानीनगर), शंकर दादा भिसे (रा. काटेवाडी, ता. बारामती), संदीप संजय गायकवाड (रा. कसबा, बारामती), दयानंद उद्धव गोसावी व कृष्णा शशीराव जेवाडे (रा. जवाहरनगर, इंदापूर रोड, बारामती) यांच्यासह डॉ. स्वप्निल नरुटे व एका अल्पवयीन मुलाचा समावेश असल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. पोलिसांनी या टोळीविरोधात यापूर्वी सदोष मनुष्यवधासह अन्य कलमांनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणातील आरोपी डॉ. स्वप्नील नरुटे याला दोन दिवसांपूर्वी जामीन मिळाला आहे, अशी माहिती एपीआय महेश विधाते यांनी दिली.

 

टॅग्स :BaramatiबारामतीremdesivirरेमडेसिवीरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटकCourtन्यायालय