शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात हॉटेल चालकाकडून खंडणी वसूल करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाला जामीन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2021 17:22 IST

हॉटेल बंद करा अन्यथा हॉटेलवर कारवाई करेन अशी धमकी देत मुंढव्यातील तीन हॉटेल चालकांकडून खंडणी वसूल केली होती

ठळक मुद्देसाक्षीदारांवर दबाव न टाकणे आणि पोलीस स्टेशनला बोलावतील तेव्हा हजेरी लावणे या अटींवर जामीन मंजूर

पुणे : ताबडतोब हॉटेल बंद करा अन्यथा हॉटेलवर कारवाई करेन अशी धमकी देत मुंढव्यातील तीन हॉटेल चालकांकडून खंडणी वसूल केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षकाला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए.एस. देशपांडे यांनी जामीन मंजूर केला.

मिलन शंतनू कुरकुटे असे पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. हॉटेल मँनेजर मारूती कोंडिबा गोरे यांनी फिर्याद दिली आहे. हिंजवडी पोलीस ठाण्यात नियुक्तीला असलेला कुरकुृटे हा २१ ऑगस्ट पासून वैैद्यकीय कारणास्तव रजेवर होता. मंगळवारी रात्री पोलीस गणवेशात स्वत:च्या चारचाकी गाडीतून मुंढव्यातील एका हॉटेलमध्ये गेला. हॉटेल ताबडतोब बंद करा अन्यथा कारवाई करेन अशी धमकी गोरे यांना दिली. कारवाई व्हायची नसेल तर दोन हजार द्या सांगितले आणि जबरदस्तीने दोन हजार रूपये त्यांच्याकडून घेतले. त्यानंतर हॉटेल वन लॉज आणि एबीसी रस्त्यावरील हॉटेल कार्निव्हल अशा आणखी दोन हॉटेलच्या मँनेजरकडून अनुक्रमे दोन आणि तीन हजार रूपये अशी एकूण ७ हजार रूपयांची खंडणी कुरकुटे याने घेतली असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. 

साक्षीदारांवर दबाव न टाकणे आणि पोलीस स्टेशनला बोलावतील तेव्हा हजेरी लावणे या अटींवर जामीन मंजूर 

कुरकुटे याला शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. कुरकुटे याने जामिनासाठी अँड अमेय डांगे यांच्यामार्फत अर्ज केला होता. मात्र सरकारी वकिलांनी जामिनास विरोध करीत गुन्हयातील आरोपीविरूद्ध सबळ पुरावा गोळा करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करणे आहे असे सांगून न्यायालयीन कोठडीची मागणी केली. मात्र अँड डांगे यांनी आरोपी पोलिसाकडून गणवेश, कार आणि रक्कम असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपी पोलीस तपासास सहकार्य करण्यास तयार आहे. याप्रकरणी दाखल गुन्हयासाठी जास्तीत जास्त ३ वर्षांची शिक्षा आहे. असा युक्तिवाद केला. त्यावर न्यायालयाने साक्षीदारांवर दबाव न टाकणे आणि पोलीस स्टेशनला बोलावतील तेव्हा हजेरी लावणे या अटींवर कुरकुटे याला जामीन मंजूर करण्यात आला आहे.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटकCourtन्यायालय