भाजप-सेनेने दाेन्ही पक्षांचा मुख्यमंत्री करावा- रामदास अाठवले

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2018 04:39 PM2018-10-14T16:39:32+5:302018-10-14T17:00:24+5:30

बहुजन वंचित अाघाडी ही वंचितांना सत्तेपासून दूर ठेवणारी अाघाडी असल्याचा अाराेप केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास अाठवले यांनी केला.

bahujan vanchit aghadi is form to keep away depressed people from power says athavle | भाजप-सेनेने दाेन्ही पक्षांचा मुख्यमंत्री करावा- रामदास अाठवले

भाजप-सेनेने दाेन्ही पक्षांचा मुख्यमंत्री करावा- रामदास अाठवले

Next

पुणे : बहुजन वंचित अाघाडी ही वंचितांना सत्तेपासून दूर ठेवणारी अाघाडी असल्याचा अाराेप केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास अाठवले यांनी केला. तसेच वंचित अाघाडीमुळे भाजपालाच फायदा हाेणार असल्याचेही ते म्हणाले. पुण्यात अायाेजित पत्रकार परिषदेत ते बाेलत हाेते. अाठवले म्हणाले,  दलित, बहुजन ही काॅंग्रेसची मते बहुजन वंचित अाघाडीमुळे काॅंग्रेसला मिळणार नाहीत, त्यामुळे त्याचा फायदा हा भाजपालाच हाेणार अाहे. 2019 ला भाजपाचंच सरकार सत्तेत येईल. येत्या निवडणुकींसाठी भाजप शिवसेनेने युती करावी.

विधानसभेच्या निवडणुकींसाठी सुद्धा भाजप-सेनेने युती करून अडीच-अडीच वर्षांचा दाेन्ही पक्षांचा मुख्यमंत्री करावा. लाेकसभेत अारपीअायचा काेणीही प्रतिनिधी नाही. मी राज्यसभेवर अाहे. त्यामुळे लाेकसभेत अारपीअायचे प्रतिनिधित्व असावे म्हणून मी लाेकसभेची निवडणूक दक्षिण मुंबईमधून लढविण्यास उत्सुक अाहे. सध्या ही जागा शिवसेनेकडे अाहे. भाजप शिवसेनेची युती झाल्यास ही जागा शिवसेना माझ्यासाठी साेडेल अशी अाशा त्यांनी यावेळी व्यक्त केली. 

मी टू बाबत अाठवले म्हणाले, मी टू मध्ये या चळवळीमुळे ज्यांची नावे समाेर अाली अाहेत त्यापैकी जे दाेषी असतील त्यांच्यावर कारवाई हाेईल. नाना पाटेकर दाेषी असतील तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल. मात्र या चळवळीचा काेणी गैरफायदा घेऊ नये. काेणी गैरफायदा घेतल्यास पाेलिसांनी त्यांच्यावरही कारवाई करावी. माझ्याबाबत बाेलायचे झाल्यास माझा संबंध मी टू शी नाही तर यू टू शी असल्याची काेटीही त्यांनी यावेळी केली. 

Web Title: bahujan vanchit aghadi is form to keep away depressed people from power says athavle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.