शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

दिवसाढवळ्या भर चौकात हातातून पळवली पैशाची पिशवी; तब्बल ३ लाख गमावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2021 15:39 IST

शिरूर तालुक्यातील शिक्रापूर येथील घटना; दोन युवकांवर गुन्हा दाखल

ठळक मुद्देघटनास्थळी पाहणी केली असता चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्याचे आले समोर

शिक्रापूर: शिक्रापूर ता. शिरूर येथील शिवसेना उपतालुका प्रमुख हॉटेल चालकाच्या हातातील तब्बल तीन लाख रुपये चोरल्याची घटना घडली आहे. दुचाकीहून आलेल्या दोघांनी दिवसाढवळ्या गर्दीच्या भर चौकातून हातातून पिशवी हिसकावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चोरटे सीसीटिव्हीत कैद झाले आसून शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे दोन अज्ञात युवकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिरूर तालुक्यातील पारोडी ता. शिरूर येथील हॉटेल व्यावसायिक तसेच शिवसेना शिरूर तालुका उपप्रमुख रोहिदास शिवले हे शिक्रापूर येथील पाबळ चौकातील एक्सिस बँकेमध्ये पैसे काढण्यासाठी आपल्या मुलासह आलेले होते. त्यांनी बँकेतून पाच लाख रुपये काढले. त्यांनतर त्यांचा मुलगा दोन लाख रुपये घेऊन गेला. रोहिदास शिवले हे त्यांच्या जवळील पिशवीमध्ये तीन लाख रुपये ठेवून दुचाकीहून पैसे घेऊन चालले होते.

अचानकपणे दोन युवक तोंडाला रुमाल बांधून दुचाकीहून त्यांच्या जवळ येत शिवले यांच्या हातातील पैशांची पिशवी घेऊन भरधाव वेगाने चाकण चौकाच्या दिशेने पळून गेले. यावेळी शिक्रापूर पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी देखील घटनास्थळी धाव घेत पाहणी केली असता येथील काही सिसिटीव्ही मध्ये सदर दोन अज्ञात चोरटे कैद झाले असल्याचे दिसून आले आहे.

याबाबत रोहिदास बाजीराव शिवले वय ५२ रा. शिवतक्रार म्हाळुंगी ता. शिरूर जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आसून शिक्रापूर पोलिसांनी दोन अज्ञात चोरट्यानवर गुन्हे दाखल केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजीत पठारे व पोलीस शिपाई अविनाश पठारे हे करत आहे.

टॅग्स :ShirurशिरुरPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीArrestअटक