शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

इंदापूरातील बाबीर देवाच्या यात्रेला प्रारंभ; हजारो भाविक बाबीरनगरीत दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2023 13:19 IST

तीन दिवस भरणाऱ्या यात्रेचा बुधवार हा मुख्य दिवस असून राज्याच्या कानाकोपऱ्यातून सुमारे ४ लाखांहून अधिक भाविक या यात्रेसाठी हजेरी लावतात

कळस: रुई (ता. इंदापूर) येथील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान बाबीर देवाच्या यात्रेला आज मंगळवारी प्रारंभ झाला. सकाळी गावातून देवाचा भव्यदिव्य पालखी सोहळा पार पडल्यानंतर घट उद्यापन करण्यात आले. यात्रेसाठी हजारो भाविक बाबीरनगरीत दाखल झाले असून नगरी भक्ती रसात चिंब झाली आहे.  तीन दिवस भरणाऱ्या यात्रेचा बुधवार (दि १५) हा मुख्य दिवस आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून सुमारे चार लाखांहून अधिक भाविक या यात्रेसाठी हजेरी लावत असतात. यामुळे यात्राकाळात भाविकांच्या दृष्टीने अनेक उपयायोजना करण्यात आल्या आहेत. ग्रामपंचायत, यात्रा समिती व देवस्थान ट्रस्ट, पोलीस यंत्रणा व प्रशासनाच्या माध्यमातून यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. मंदिर परिसरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाही येथे भव्य गजढोल स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. यादिवशी भाविक नवसाची परतफेड करण्यासाठी व देवदर्शनासाठी लाखोंच्या संख्येने हजेरी लावतात. गुरूवारी (ता. १६) नवसाच्या बगाडाचा, पकाळणी भाकणूकीचा कार्यक्रम होईल. यात्रेनिमित्त सध्या मंदिर सुशोभिकरण, पिण्याच्या पाण्याचे नियोजन, दिवाबत्तीची सोय करण्यात आली आहे. मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई व सजावट करण्यात आली आहे. यात्रेत घोंगडी बाजारपेठ मोठी भरली आहे तसेच भाविकांनी यात्रा फुलून गेली आहे.  राजकीय रेलचेल 

यात्रेच्या मुख्य दिवशी बुधवारी बाबिर भक्तांचा मेळावा पार पडणार आहे. यावेळी खासदार सुप्रिया सुळे, आमदार दतात्रय भरणे, गोपीचंद पडळकर, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, राम शिंदे उपस्थित राहणार आहेत. आगामी लोकसभा व विधासभेच्या दृष्टिने राजकीय रेलचेल महत्वाची ठरणार आहे. 

टॅग्स :PuneपुणेIndapurइंदापूरTempleमंदिरSocialसामाजिक