अजब ‘गुलाब’ की गजब कहानी....!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2018 19:40 IST2018-08-11T19:33:22+5:302018-08-11T19:40:59+5:30

गुलाबाच्या झाडाच्या उंचीचा अंदाज बांधणे तसे थोडे अवघडच..पण सुखसागरनगर येथील कल्पवृक्ष बंगल्यात अजब प्रकारच्या गजब गुलाबाने थेट ३० फुटापर्यंत उंची गाठत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. 

Awesome 'Gulab' 's strange story ....! | अजब ‘गुलाब’ की गजब कहानी....!

अजब ‘गुलाब’ की गजब कहानी....!

ठळक मुद्देगावठी गुलाब : विस्तार झाला तब्बल ३० फुटांपर्यंत 

बिबवेवाडी :  गुलाबाचे आकर्षण नसणारा माणूस सापडणे अशक्यच...! कारण प्रत्येकाच्या आयुष्यात गुलाबाचे ‘स्थान ’ तसे खूपच जवळचे..   गुलाबाच्या झाडाच्या उंचीचा अंदाज बांधणे तसे थोडे अवघडच..पण बिबवेवाडीतील कल्पवृक्ष बंगल्यात अजब प्रकारच्या गजब गुलाबाने थेट ३० फुटापर्यंत उंची गाठत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. 
ही घटना आहे बिबवेवाडी पोलिस चौकीचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नानासाहेब भारूड यांच्या घरी लावलेल्या गुलाबाची. त्यांनी आवड म्हणून गावठी गुलाबाचे रोप त्यांच्या सुखसागरनगर येथील कल्पवृक्ष या राहत्या घरी ४ ते ५ वर्षांपूर्वी लावले होते. परंतु ,बघता बघता या गावठी गुलाबाच्या रोपाचे ३० फुटी झाडांत रूपांतर झाले. 
नानासाहेब भारूड हे मुळचे कोपरगांव येथील शेतकरी कुटुंबातील. त्यामुळे त्यांना शेतीची व झाडांची आवड असून, पोलीस खात्यातील नोकरी करत असतानाही त्यांनी आपली आवड जपली.या गुलाबाच्या झाडासाठी त्यांनी संपूर्णपणे सेंद्रिय खताचा वापर केला असून, हे सेंद्रिय खत सुद्धा स्वयंपाक घरातील ओल्या कचऱ्यापासून तयार करतात. या सेंद्रिय खतामुळेच या गुलाबाच्या झाडाची वाढ झाली असे भारूड यांनी सांगितले.या गावठी गुलाबाच्या झाडाला १२ महिने हलक्या गुलाबी रंगाचे ताटवे फुलले असतात. फुले नेहमी झाडावरच चांगली दिसतात या विश्वासातून या झाडाचे गुलाब ते कधीही तोडत नाहीत. त्यामुळे या परिसरांत या ४० फुटी गुलाबाच्या झाडाची परिसरांत आकर्षण व चर्चा असते.

Web Title: Awesome 'Gulab' 's strange story ....!