शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील उत्कृष्ट गणेश मंडळांना सरकारतर्फे देण्यात येणार बक्षीस; अजित पवारांची माहिती

By नितीश गोवंडे | Updated: August 28, 2023 17:31 IST

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनीही यावेळी प्रशासनाला गणेश मंडळांच्या पाठीशी राहण्याचे आवाहन केले

पुणे : पुण्यातील गणेशोत्सव जगभरात प्रसिद्ध आहे. परदेशी लोक या उत्सवासाठी खास पुण्यात येत असतात. यासह आगामी गणेशोत्सवाच्या नियोजन बैठकीचे सोमवारी शिवाजीनगर पोलिस मुख्यालयात आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरकारतर्फे यंदा राज्यातील उत्कृष्ट गणेश मंडळांना बक्षीस देण्यात येणार असून, त्यासाठी ५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येतील असे सांगितले. तसेच ४४ उत्कृष्ट गणेश मंडळांची बक्षीसाठी निवड करण्यात येणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, पोलिस आयुक्त रितेश कुमार, विभागीय आयुक्त सौरभ राव,​​​​ ​​​जिल्हाधिकारी राजेश देशमुख, मनपा आयुक्त विक्रम कुमार, राजेश सिंग, पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांची उपस्थिती होती.

जनतेच्या भावनांचा अनादर होता कामा नये..

यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी विसर्जन मिरवणुकीसाठी फिरत्या हौदासाठी जुन्या कचरा पेट्या न वापरता स्वच्छ हौद वापरावेत. जनतेच्या भावनांचा अनादर होता कामा नये याची काळजी घेतली जावी. अनेक मंडळे दहीहंडी साजरी करतात. मागील काही दिवसांपासून हे प्रमाण वाढत आहे. सरकारने या खेळास साहसी खेळ म्हणून मान्यता दिली असून, विमा उतरवला जाणार आहे, असेही उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

पार्किंग व मिरवणुकीचे नियोजन २ दिवस आधी जाहीर करावे..

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनीही यावेळी प्रशासनाला गणेश मंडळांच्या पाठीशी राहण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की, गणेशोत्सवाविषयी मंडळांनी घेतलेल्या निर्णयांच्या अंमलबजावणीसाठी प्रशासन सहकार्य करेल. कंट्रोल टॉवर ५ दिवस अगोदर सुरू करावा. पार्किंग व मिरवणुकीचे नियोजन २ दिवस आधी जाहीर करावे. वाहतुकीच्या व्यवस्थापनासाठी १ हजार वॉर्डन वाढवण्यात येत आहेत. काहीजण पुणे शहर अशांत करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे मंडळांनी योग्य ती खबरदारी घ्यावी.

न्यायालयाच्या आदेशानुसार काम करणार..

पोलिस आयुक्त रितेश कुमार म्हणाले की, काही गोष्टी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने कराव्या लागतात. त्यामुळे ध्वनीक्षेपकांविषयी कारवाई करावी लागते. ठरवून दिलेल्या डेसिबलपेक्षा अधिक आवाज झाला तर कारवाई करणार. वाहतुकीबाबत मेट्रो आणि मनपा यांच्याशी चर्चा केली जाईल. शहरातील सर्व सीसीटीव्ही सुरू करण्यात येतील. वाहतुक नियमनासाठी अधिकचे मनुष्यबळ घेण्यात येत आहे. पुण्यात काही दहशतवादी मोड्यूल उघडकीस आले आहे, त्यामुळे त्यादृष्टिकोनातून सुरक्षेची योग्य ती काळजी घेतली जाईल.

टॅग्स :PuneपुणेGanpati Festivalगणेशोत्सवAjit Pawarअजित पवारchandrakant patilचंद्रकांत पाटीलBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस