पुरस्कार हा प्रकार संशयास्पद
By Admin | Updated: January 19, 2016 01:32 IST2016-01-19T01:32:53+5:302016-01-19T01:32:53+5:30
ज्ञानोबा-तुकारामनगरी, पिंपरी : पुरस्कारांचे अतोनात आकर्षण वाङ्मयीन क्षेत्रात आहे, वाङ्मयीन व्यवहारही पुरस्कारांवर ठरतो, तसेच, पुरस्कार लेखकांना सांस्कृतिक, सामाजिक मान्यता देतात

पुरस्कार हा प्रकार संशयास्पद
ज्ञानोबा-तुकारामनगरी, पिंपरी : पुरस्कारांचे अतोनात आकर्षण वाङ्मयीन क्षेत्रात आहे, वाङ्मयीन व्यवहारही पुरस्कारांवर ठरतो, तसेच, पुरस्कार लेखकांना सांस्कृतिक, सामाजिक मान्यता देतात यासह शासनाच्या पुरस्काराचे वैभव सूर्यप्रकाशाएवढे मोठे आहे, पुरस्कारापेक्षा साहित्यिक सुरक्षित असणे गरजेचे आहे, समाज, संस्कृती आणि वाङ्मय यांमध्ये पुरस्कार हा प्रकार संशयास्पद आहे, अशी वेगवेगळी मते लेखकांनी ‘मराठी वाङ्मय क्षेत्रातील पुरस्कारांचे सामाजिक व सांस्कृतिक स्थान’ या विषयावरील परिसंवादात मांडली.
८९व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात सोमवारी शाहीर अण्णा भाऊ साठे सभागृहात या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे अध्यक्षस्थानी होते. या परिसंवादात संजय जोशी, किशोर बेडकीहाळ, डॉ. मनोज तायडे, मंगेश काळे, सुरेश वांदिले यांनी सहभाग घेतला.
तायडे म्हणाले, ‘‘पुरस्कार लेखकाला सांस्कृतिक, सामाजिक मान्यता देतात; मात्र त्यामुळे लेखक मोठा होत नसतो, तर त्याच्या लेखनामुळे तो मोठा होत असतो. पुरस्काराचा अनेकांना चांगला उपयोग होतो.’’
वांदिले म्हणाले, ‘‘शासनाच्या पुरस्काराने अनेकांना आनंद होतो. मात्र, सध्याच्या व्यवस्थेत सर्वांचेच समाधान करणे शक्य होत नाही.
समाज, संस्कृती आणि वाङ्मय यांमध्ये पुरस्कार हा प्रकार संशयास्पद आहे. पुरस्कार संस्कृतीचे महत्त्व कुठे शोधायचे? हीदेखील संशयास्पद बाब आहे. लेखनाचे प्रयोजन हरवत चाललेय, अशी खंत काळे यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)