वारज्यात उभी राहणार अधिकृत भाजी मंडई
By Admin | Updated: December 12, 2014 00:15 IST2014-12-12T00:15:12+5:302014-12-12T00:15:12+5:30
कव्रेनगर व वारजे परिसरात तब्बल 11 भाजी मंडई व ओटय़ांचे आरक्षण असूनही एकही मंडई विकसित झाली नसल्याचे वृत्त लोकमतने दिले.

वारज्यात उभी राहणार अधिकृत भाजी मंडई
वारजे : कव्रेनगर व वारजे परिसरात तब्बल 11 भाजी मंडई व ओटय़ांचे आरक्षण असूनही एकही मंडई विकसित झाली नसल्याचे वृत्त लोकमतने दिले. त्याची गंभीर दखल घेत स्थानिक नगरसेवकांनी आरक्षित जागा ताब्यात घेण्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार वारज्यातील पहिली अधिकृत मंडई (ओटा मार्केट) प्रभाग क्रमांक 31 येथील गणपती माथा परीसरातील एनडीए रस्त्याच्या बाजुला उभारण्यात येणार आहे.
‘आरक्षण असूनही मंडई कागदावरच’ असे वृत्त लोकमतमध्ये गुरुवारी प्रसिध्द झाले. त्यामुळे स्थानिक नगरसेवकांनी त्याची गंभीर दखल घेत अधिका-यांना आरक्षित जागा ताब्यात घेण्याची सद्यस्थितीची माहिती घेतली. त्यानुसार गणपती माथा परिसरातील ओटा मार्केटसाठी आरक्षित जागा ताब्यात देण्याची तयारी बांधकाम व्यावयिकांने दाखविली आहे. त्यानुसार ही जागा ताब्यात घेण्यासाठी अधिका-यांकडे पाठपुरावा करून मंडई उभारण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिकेच्या अर्थसंकल्पात तरतूद करण्यात येईल, असे स्थानिक नगरसेवकांनी सांगितले.
आरक्षित जागा वारजे येतील जुन्या मंडईपासून अवघ्या 3क्क् मीटरवर आहे. मुख्य एनडीए रस्त्याला लागून असलेल्या मोकळ्य़ा जागेवर महापालिकेचे आरक्षण आहे. आरक्षणाचे ठिकाण हे मध्यवर्ती असल्याने वारजेसह शिवणो व त्यापुढेही जाणा-या ग्राहकांची वर्दळ असते. (वार्ताहर)
4वारजे येथील प्रभाग क्रमांक 3क् व 31 येथील विविध आरक्षणाच्या जागा ताब्यात घेवून त्याठिकाणी सार्वजनिक सुविधा उभारण्यासाठी स्थानिक नगरसेवक नगरसेवक दिलीप बराटे, सचिन दोडके, भाग्यश्री दांगट व लक्ष्मी दुधाने असा एकत्रित प्रयत्न करणार आहेत. एकदा जागा ताब्यात आल्या की मंडई बांधण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे, असे संबंधित नगरसेवकांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.