शहरं
Join us  
Trending Stories
1
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
2
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
3
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
4
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
5
"अभी तो मै जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
6
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
7
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
8
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
9
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
10
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
12
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
13
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
14
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
15
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
16
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
17
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
18
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
19
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
20
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
Daily Top 2Weekly Top 5

कासारवाडी पुलाचे आकर्षण कायम

By admin | Updated: February 15, 2015 00:03 IST

शहराच्या नावलौकिकात भर घालणाऱ्या कासारवाडीतील भारतरत्न जे. आर. डी. टाटा दुमजली उड्डानपुलास रविवारी एक वर्ष पुर्ण होत आहे.

पिंपरी : शहराच्या नावलौकिकात भर घालणाऱ्या कासारवाडीतील भारतरत्न जे. आर. डी. टाटा दुमजली उड्डानपुलास रविवारी एक वर्ष पुर्ण होत आहे. वर्ष उलटूनही या भल्या मोठ्या पुलाची आकर्षण अद्याप टिकून आहे. अद्यापही पुलाच्या परिसरात छायाचित्रे टिपताना नागरिक दृष्टिस पडतात. आल्हादायक वातावणाचा आनंद लुटण्यासाठी पुलावर सायंकाळी फेरफटका मारणाऱ्यांची संख्या वाढतच आहे. चित्ताकर्षक पुलाचे विविध छायाचित्रे सोशल साईटवर लाईक्स मिळवत आहेत. सर्वात उंच आणि सर्वांत भव्य असा हा पुल उद्योगनगरीतील आगळेवेगळे वैशिष्टये ठरले आहे. उत्कृष्ट बांधकामाचा नमुना असलेल्या हा वैशिष्टयपूर्ण पुल नागरिकांचे आकर्षक ठरले आहे. केंद्र सरकारच्या जेएनएनयुआरएम योजनेतंर्गत १३० कोटीपेक्षा अधिक रुपये खर्च करुन हा आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे पुल तयार झाला. गेल्या वर्षी १५ फेब्रुवारीला हा पुल वाहतूकीस खुला झाला. रेल्वेमार्ग, पवना नदी, पुणे- मुंबई महामार्ग ओलांडणारा हा दुमजली पुल राज्यातील पहिल्याच असल्याचे महापालिकेचा दावा आहे. कासारवाडीहून भोसरीकडे जाणारा एकेरी मार्गाचा पुल आहे. या वरच्या पुलाची लांबी १.१ किलोमीटर आहे. तर, दुसरा पिंपळे गुरवहून भोसरीकडे जाणारा खालचा पुल आहे. त्याची लांबी ७०० मीटर आहे. या मार्गावर बीआरटीएसचा स्वतंत्र तयार केला आहे. तसेच, पायी जाणाऱ्या नागरिकांसाठी पदपथ आहे. पुलामुळे पुणे- मुंबई आणि पुणे- नाशिक महामार्गाची वाहतूक सुरळीत होण्यास मदत झाली आहे. नाशिक फाटा चौकात वारंवार होणारी कोंडी सुटली आहे. निळा व पिवळा रंंगाच्या प्रकाशझोतात पुल संध्याकाळनंतर उजळून निघतो. आजूबाजूच्या इमारती, वाहणारी पवना नदी, पुणे व लोणावळ्याच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वे गाड्या, पुणे- मुंबई महामार्ग, सीएमईचा मोकळा परिसर, एमआयडीसी आदी भाग पाहताना नागरिक हरखून जातात. फेरफटका मारण्यासाठी नागरिक सहकुटुंब संध्याकाळी पुलावर गर्दी करत आहेत. ती मध्यरात्रीपर्यत कायम असते. सुट्टीच्या काळात त्यात वाढ होते. गप्पा मारत बसलेले नागरिक, खेळत असलेली मुले असे चित्र येथे नेहमी पाहावयास मिळते. बीआरटीएस बस मार्ग बंद असल्याने तेथे निवांत बसून गप्पाची मैफल रंगते. मध्यरात्री वाढदिवसाचा केक कापून वाढदिवस साजरा करण्यासाठी अनेकाचे ग्रुप येथे आवर्जुन येतात. भव्य पुल आणि आजूबाजूच्या उंच उंच इमारती, हिवरळ असल्याने परदेशातील एकाद्या स्मार्ट सिटीचा भास होतो. नागरिक मोबाईल व कॅमेऱ्याद्वारे छायाचित्रे टिपतात. वेगवेगळ्या कोनातून पुलाची छायाचित्रे टिपली जातात. प्रवासी नागरिक भव्य पुल पाहून ते हरखून जातात. पुलाची छबी टिपण्यासाठी त्याचे मोबाईल क्लिक होतात. पहाटे व सकाळी वार्कीग व व्यायाम करण्यासाठी येथे पसंती दिली जाते.हा अनोखा पुल पाहण्यासाठी इतर भागांतील नागरिक पुलास भेट देतात. काही वेळ पुलावर थांबून शहराचे नव्या रुपाचे दर्शन घेतात. पुलाची असंख्य छायाचित्रे सोशल साईटवर अजूनही लाइक्स मिळवीत आहेत. (प्रतिनिधी)४रस्त्यापासून पुलाची उंची २१ मीटर आहे. पुलाचे काम ३० महिन्यात पुर्ण केले गेले. वरच्या पुलाची लांबी १.१ किलोमीटर अंतर आहे. खालच्या पुलाची लांबी ७०० मीटर आहे. पुलास एकूण खर्च १३० कोटीपेक्षा अधिक झाला आहे. यासाठी जागतिक बॅँकेचे कर्ज घेण्यात आले आहे. बीआरटी मार्ग अद्याप बंद : ४पुलास एक वर्ष पुर्ण झाला असला तरी, अद्याप तेथील बीआरटी बस मार्ग सुरू झालेला नाही. तसेच, पिंपळे गुरवहून नाशिक फाटा चौकात उतरण्यासाठी तयार असलेला रॅम्प वाहतूकीस खुला केलेला नाही.