शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात धनत्रयोदशीच्या दिवशीच दरोड्याचा प्रयत्न; हवेत गोळीबार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2022 12:06 IST

दत्तनगर जांभूळवाडी रस्त्यावरील ज्वेलर्सच्या दुकानात दरोड्याचा प्रयत्न असफल

धनकवडी : धनत्रयोदशीच्या दिवशीच सशस्त्र दरोडा टाकून अधिक लुट मिळेल या उद्देशाने एका ज्वेलर्सच्या दुकानात तीन दरोडेखोर घुसले. मात्र दुकानदाराने प्रसंगावधान दाखवून अलार्म वाजविल्याने दरोडेखोरांचा प्रयत्न फसला आणि ते पळून जाऊ लागले, जाताना त्यांनी हवेत गोळीबार केला या गोळीबारात दुकानाची काच फुटली. हि घटना शनिवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास आंबेगावात घडली. श्री मल्हार ज्वेलर्स असे दरोडा टाकण्याचा प्रयत्न करण्यात आलेल्या सोन्या चांदीच्या दुकानाचे नाव आहे. शनिवारी दिवाळीचा पहिलाच दिवस सर्वत्र मोठ्या आनंदाने आणि उत्साहात साजरा करण्यात येत असतानाच झालेल्या गोळीबाराच्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. दरम्यान घटनेची माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिसरातील तसेच दरोडेखोर पळून गेलेल्या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासणी सुरू केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दत्तनगर चौकातून जांभूळवाडी कडे जाणाऱ्या मार्गावर आँलीव्ह सोसायटी मध्ये श्री मल्हार ज्वेलर्स म्हणून सोन्या चांदीचे दुकान आहे. दुकानाच्या मालकाचे नाव मुळ मालक मकरंद पावले, कोल्हापूर मध्ये असतात. आकाश कडोले हे दुकान बघतात. शनिवारी रात्री साडेदहाच्या दरम्यान आकाश भरस कडोले (वय २८ वर्ष रा. रविवार पेठ ) दुकानातील आवरा अवर करून दुकान बंद करण्याच्या तयारीत होते. तेवढ्यात रिव्हॉल्व्हर आणि कोयता घेऊन दोन दरोडेखोर दुकानात शिरले, सशस्त्र चोरांना पाहून घाबरलेल्या दुकानदाराने लगेच अलार्म दाबला.. अलार्म चा आवाज ऐकून दोघेही पळून जाऊ लागले. मात्र जाताना त्यांनी हवेत गोळीबार केला या गोळीबारातील एक गोळी दुकानाच्या काचेला लागून काच फुटली. बाहेर एकजण उभा होता. जाताना तिघेजण दुचाकीवरून पसार झाले.

टॅग्स :DhankawadiधनकवडीPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीArrestअटकGoldसोनं