धनकवडी: कात्रज येथील राजीव गांधी प्राणी संग्रहालयच्या आवारात शिरून चोरट्यांनी चंदनाची झाडे कापून चोरीचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली असून या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत सुरक्षा रक्षक श्रीपती देवीदास कसबे (वय ३०, रा. शिवनेरीनगर, कोंढवा) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्यरात्रीच्या सुमारास चोरटे प्राणी संग्रहालयाच्या आवारात शिरले. त्यांनी आवारातील चंदनाची चार झाडे कापून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुरक्षारक्षकांच्या निदर्शनास हा प्रकार येताच चोरटे घटनास्थळावरून पसार झाले. दरम्यान, यापूर्वीही प्राणी संग्रहालयाच्या आवारातून चंदनाची झाडे चोरीला गेल्याच्या घटना घडल्या असल्याचे समोर आले आहे. त्या मुळे सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुलकुमार खिलारे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून, चोरट्यांचा शोध सुरू आहे. आवारातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासून आरोपींचा माग काढला जात आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील पाटील करत आहेत.
Web Summary : Thieves tried to steal sandalwood trees from Rajiv Gandhi Zoo in Katraj. Security guards intervened, causing the thieves to flee. Police are investigating the incident, reviewing CCTV footage, and searching for the suspects. Previous sandalwood thefts have raised security concerns at the zoo.
Web Summary : पुणे के राजीव गांधी प्राणी संग्रहालय में चंदन के पेड़ चुराने का प्रयास विफल रहा। सुरक्षा गार्डों के हस्तक्षेप के बाद चोर भाग गए। पुलिस मामले की जांच कर रही है, सीसीटीवी फुटेज की समीक्षा कर रही है, और संदिग्धों की तलाश कर रही है। पहले भी चंदन चोरी की घटनाओं से चिड़ियाघर में सुरक्षा चिंताएं बढ़ी हैं।