खेड तालुक्यातील खरपुडी येथे दोघांवर तरसाचा हल्ला; हातापायाचे लचके तोडल्यानं दोघे गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2021 03:00 PM2021-09-05T15:00:11+5:302021-09-05T15:00:19+5:30

अखेर या तरसाचा मोटारसायकलच्या धडकेत मूत्यू झाला. नागरिक व शेतकऱ्यांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.

Attack on two at Kharpudi in Khed taluka; Both were seriously injured after breaking their limbs | खेड तालुक्यातील खरपुडी येथे दोघांवर तरसाचा हल्ला; हातापायाचे लचके तोडल्यानं दोघे गंभीर जखमी

खेड तालुक्यातील खरपुडी येथे दोघांवर तरसाचा हल्ला; हातापायाचे लचके तोडल्यानं दोघे गंभीर जखमी

googlenewsNext
ठळक मुद्देबिबट्या पाठोपाठ तरसाच्या हल्ल्यांमुळे नागरिकात भीतीचे वातावरण

दावडी : खेड तालुक्यातील खरपुडी खंडोबा येथे तरसाने हल्ला करून दोघांना गंभीर जखमी करून हातापायाचे लचके तोडले. अखेर या तरसाचा मोटारसायकलच्या धडकेत मूत्यू झाला. नागरिक व शेतकऱ्यांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.

खरपुडी खंडोबा या परिसरात वनपरिक्षेत्र आहे. वनपरिक्षेत्रात मोर, तरस, कोल्हा, लांडगा,बिबट्या याचा संचार आहे. तरस या वन्यप्राण्यानं धुमाकूळ घालून व पुरुषांसह काही जनावरांना चावा घेवून जखमी केल्याने या परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. आज सकाळी वाकी येथील शेतकरी पांडुरंग सहादू जाधव हे शेताकडे येत असताना तरसाने त्यांच्यावर हल्ला केला.

तसेच राहूल गाडे हे मोटारसायकलवर जात असताना रस्त्यावर तरस अचानक आडवा आला. मोटार सायकलची धडक तरसाला बसल्यामुळे राहूल गाडे हे रस्त्यावर पडले. दरम्यान तरसाने गाडे यांच्यावर हल्ला चढवून हाताला चावा घेऊन गंभीर जखमी केले. मोटारसायकलची धडक जोरात बसल्यामुळे तरसाच्या तोडाला जोराचा मार लागल्यामुळे काही अंतरावर जाऊन तरसाचा मूत्यू झाला असं वनविभागाने सांगितलंय. ग्रामस्थांनी जखमीना प्राथमिक उपचारसाठी तात्काळ चाकण येथे दाखल केले. मात्र गंभीर जखम असल्याने पुणे येथील ससुन रुग्णालयात हलविले आहे. घटना समजताच वनपरिक्षेत्र अधिकारी दत्तात्रय फापाळे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केलाय. 

Web Title: Attack on two at Kharpudi in Khed taluka; Both were seriously injured after breaking their limbs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.