शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
2
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाख मोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
3
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
4
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
5
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
6
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
7
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ
8
क्या बात! रितेश देशमुखच्या आईसाहेबांनी बल्बच्या प्रकाशात घेतलं ड्रॅगन फ्रूटचं पीक; सूनबाईंना कौतुक, शेअर केला व्हिडीओ
9
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
10
Viral Video : नवी नवरी सोबत बॉयफ्रेंडलाही घेऊन आली; सासरच्या घरात कुठे लपवला व्हिडीओ बघाच
11
...तर १ जानेवारी २०२६ पासून तुमचं पॅन बंद होईल; बँक व्यवहारांसह सर्व महत्त्वाची कामं अडकतील
12
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
13
Claudia Sheinbaum: सुरक्षा भेदून क्लाउडिया शीनबामपर्यंत पोहोचला; भररस्त्यात स्पर्श आणि चुंबनाचा प्रयत्न!
14
भाजीवाल्याने मित्राकडून पैसे उधार घेतले अन् जिंकले ११ कोटी; आता देणार मोठं 'थँक यू' गिफ्ट
15
Numerology: अंकशास्त्रानुसार आपल्यासाठी कोणत्या जन्मतारखेची व्यक्ती परफेक्ट जोडीदार असते?
16
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
17
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
18
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
19
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
20
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?

‘जमतारा’त गेलेल्या पुणे पोलिसांच्या जीवावर बेतले; सायबर क्राईमसाठी तरुणांना देण्यात आले प्रशिक्षण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2020 02:06 IST

पुणे पोलिसांचे पथक जमतारामध्ये आरोपींच्या शोधासाठी अनेकदा गेले होते.

- विवेक भुसेपुणे : सायबर क्राईमचे सर्वांत मोठे केंद्र म्हणून ओळख असलेल्या झारखंडमधील जमतारा जिल्ह्यात आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पुणे पोलिसांच्या पथकाला दगडफेकीला सामोरे जावे लागले. तेथे असलेल्या महाराष्ट्रीय पोलीस अधीक्षकांनी मदत पुरविल्याने ते जीवानिशी परत येऊ शकले.

‘जमतारा सबका नंबर आयेगा’ ही वेबसिरीज सध्या गाजत आहे. कोणतेही काम नसल्याने जंगलात झाडाखाली बसून मोबाईलवरुन देशभरातील लोकांना कॉल करुन त्यांची फसवणूक करण्याचा धंदा येथील तरुणांनी सुरु केला. त्यामुळे देशभरातून ओटीपी क्रमांक मिळवून त्यावरुन बँक खात्यातून पैसे काढून घेण्याच्या तक्रारी येत होत्या. त्यातून जमतारा हा जिल्हा देशभर बदनाम झाला होता. तेथे जाऊन तपास करुन आरोपींना पकडणेही मुश्किल होते. पुणे पोलिसांचे पथक जमतारामध्ये आरोपींच्या शोधासाठी अनेकदा गेले होते. तेव्हा त्यांना आलेले अनुभव भयानक होते. अशा परिस्थितीत त्यांनी तीन आरोपींना पकडून आणले होते.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक राधिका फडके यांनी सांगितले की, झारखंडमध्ये अतिशय गरिबी आहे. कोळसा खाणींशिवाय इतर कोणतेही उद्योग नाही़ त्यामुळे तरुणांना रोजगाराचे साधन नाही़ १०वी, ११ वी पास झालेल्या तरुणांना दुसरा उद्योगच नसल्याने काही जण कोळसा चोरुन नेणे नाही तर सायबर क्राईम असे गुन्हे करण्यास प्रवृत्त होत असल्याचे दिसून आले़ आम्ही ज्यांना पकडून आणले होते़ त्यांच्याकडे चौकशी केल्यावर त्यांनी सांगितले होते की, आम्हाला ट्रेनिंग दिले गेले होते. त्यानंतर आमच्याकडून सायबर गुन्हे करुन घेऊन त्यातून त्यांनी फी वसूल केली होती़ म्हणजे तेथे सायबर क्राईम कसा करावा, याचे चक्क क्लासेस घेतल जात असावेत, असे दिसून येत होते.जमताराचे केंद्र प. बंगालच्या सीमेवरसायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे यांनी सांगितले की, जमतारा हे बदनाम झाल्याने झारखंडच्या पोलिसांनी मोठा ड्राईव्ह घेतला होता. त्यांनी देशातील सर्व पोलीस ठाण्यांना एका विशिष्ट पद्धतीने एफआयआर पाठविण्यास सांगितले होते. त्यानुसार त्या आरोपींचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेऊन संबंधितांना कळविण्यास सुरुवात केली. त्यामुळे आता जमतारा येथील सायबर क्राईमचे सेंटर पश्चिम बंगालच्या सीमेकडे सरकले आहे.

टॅग्स :Policeपोलिस