शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

येरवडा येथे किरकोळ कारणावरून तीक्ष्ण हत्याराने एकावर प्राणघातक हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2020 12:04 IST

वैयक्तिक कारणावरून झालेल्या वादातून एकाला तीक्ष्ण हत्याराने जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना गुरुवारी रात्री येरवड्यात घडली.

पुणे - वैयक्तिक कारणावरून झालेल्या वादातून एकाला तीक्ष्ण हत्याराने जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना गुरुवारी रात्री येरवड्यात घडली. विजय गणपत रणसुरे(वय 32,रा नवी खडकी येरवडा) याला या घटनेत गंभीर मारहाण झाली आहे. या प्रकरणी शिव वाहतूक सेनेचा अध्यक्ष बापू खरात, स्विकृत सदस्य राकेश चौरे, गणेश मोरे, स्वप्नील कांबळे यांना गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. 

गुरूवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास बापू खरात याने विजय याला शास्त्रीनगर पाण्याच्या टाकीजवळ बोलाऊन घेतले. राकेश चौरे याच्या पत्नीसोबत का बोलतो या कारणावरून त्यांच्यात वादावादी झाली. याचवेळी खरात याच्यासह  चौरे, गणेश व स्वप्निल यांनी विजय याला लाथा बुक्यांनी मारहाण करीत तीक्ष्ण हत्याराने वार केले. गंभीर जखमी अवस्थेत विजय याने येरवडा पोलिस स्टेशन गाठले. येरवडा पोलिसांनी तात्काळ त्याला उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल केले. तसेच घटनास्थळी जाऊन चौघांना ताब्यात घेतले.  येरवडा पोलिसांनी चार आरोपी विरुध्द तीक्ष्ण हत्याराने जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून अटक केली आहे. 

या गुन्ह्यातील बापू खरात हा पूर्व रेकाँर्ड वरील सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत.सध्या शिवसेना प्रणीत शिव वाहतूक सेनेचा तो पुणे शहर अध्यक्ष आहे. राकेश चौरे हा येरवडा क्षेत्रिय कार्यालयाचा स्विकृत सदस्य आहे. सदरची गुन्हयाची गंभीर घटना घडल्या नंतर येरवडा पोलिस स्टेशनला अनेक राजकीय पुढारी, नगरसेवक, माथाडी नेते तसेच पूर्व रेकाँर्डवरील गुन्हेगारांनी गर्दी केली होती. घटनास्थळी पोलिस उपायुक्त सुहास बावचे, सहाय्यक पोलिस आयुक्त रामचंद्र देसाई, वरिष्ठ पोलिस निरीक्षक युनूस शेख यांनी भेटी देऊन तपासाच्या सूचना दिल्या. अधिक तपास पोलिस निरीक्षक गुन्हे अजय वाघमारे करीत आहेत.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPuneपुणेPoliceपोलिस