शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

अडीच महिन्याच्या चिमुकल्यावर बिबट्याचा जीवघेणा हल्ला; उपचारादरम्यान मृत्यू, दौंडमधील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2024 18:56 IST

ग्रामस्थांनी बिबट्या दिसणाऱ्या भागांची माहिती देऊनही वनविभागाचे त्याकडे दुर्लक्ष

केडगाव: दौंड तालुक्यातील बोरीपार्धी हद्दीत चिमूरड्या अडीच महिन्याच्या बालकावर बिबट्याने जीवघेणा हल्ला केला. तात्काळ त्याला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्या मानेचा चावा बिबट्याने घेतला होता. प्रचंड रक्तस्राव झाल्याने उपचारादरम्यान चिमुकल्याचे निधन झाले. 

रविवारी दि १७ रोजी दुपारी ४ दरम्यान सदर घटना घडली. दोन उसाला झोळीमध्ये चिमुकल्याला आईने झोपवले होते. आई-वडील समोरील शेतात ऊसतोड करत होते. सदर कुटुंब करण दिलीप गायकवाड (मुळगाव शिदवाडी ता. चाळीसगाव जि. जळगाव ) सध्या (रा. केडगाव टोल नाका ता. दौंड जि. पुणे) हे ऊस गुऱ्हाळावर तोडीसाठी गेल्या पाच वर्षापासून काम करत आहे. ऊसतोड (सरगरमळा) बोरीपार्धी येथील बाळासो भागुजी टेंगले यांच्या शेतात चालू होते. परिसर पूर्ण ऊस शेती असल्यामुळे शेतात बिबट्या लपल्याचे या मजुरांना समजले नव्हते. त्याच्या भोवती खेळत असलेल्या चिमुकलीने आरडाओरडा केल्यानंतर तिच्यावर होणारा हल्ला टळून तो अडीच महिन्याच्या त्या चिमुरड्यावर झाला. हल्ला झाल्यावर परिसरातील लोकांनी प्रचंड मोठा आरडाओरडा केला. बिबट्याने त्या चिमुकल्याला तेथेच सोडून उसात पळ काढला. ही हृदय द्रावक घटना पाहून गरीब शेतमजूर आई-वडिलांनी हंबरडा फोडला. पाहणाऱ्याचे डोळे ओलावले होते. जेवण ग्रामीण रुग्णालयात शव विच्छेदनासाठी दाखल करण्यात आले. सहाय्यक वनसंरक्षक दीपक पवार, दौंड वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल काळे, वनपाल  वाय. के. वीर यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली.

गेल्या दोन दिवसापूर्वी शिरूर तालुक्यातील मांडवगण येथे एका चिमुकल्यावर हल्ला झाला होता. जनावरांवर हल्ल्यांचे तर नियमित झाले आहेत. मात्र मानवावर होणाऱ्या या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन केडगाव, बोरीपार्धी व दौंड तालुक्यातील सर्वच ग्रामस्थांनी वनविभागाला कळवले होते. मात्र वन विभागाने याकडे दुर्लक्ष केल्याच्या आढळून येते. गेल्या तीन महिन्यात एकही बिबट्या जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले नाही. त्यामुळे बिबट्याचा फैलाव वाढतच चालला आहे. नागरिकांनी प्रचंड संताप वनविभागावर व्यक्त केला. वन अधिकाऱ्या भोवती नागरिकांनी घेराव घातला होता.

शेतकरी वर्ग भयभीत

केडगाव बोरीपार्धी हा प्रचंड लोकवस्ती असलेला परिसर आहे. इथे हल्ला झाल्याने नागरिक हवालदिल आहे. बिबटयाच्या मानवी हल्ल्यात मृत्युमुखी पडण्याची दौंड तालुक्यातील ही पहिलीच घटना आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग भयभीत झालेला आहे.

टॅग्स :Puneपुणेleopardबिबट्याforest departmentवनविभागenvironmentपर्यावरणDeathमृत्यूNatureनिसर्ग