सहायक पोलीस निरीक्षकाला मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:14 IST2021-02-05T05:14:03+5:302021-02-05T05:14:03+5:30
पुणे : हातात काठ्या घेऊन रस्त्याने आरडाओरडा करत निघालेल्यांना शांत जाण्यास सांगितले म्हणून एका सहायक पोलीस निरीक्षकालाच शिवीगाळ करत ...

सहायक पोलीस निरीक्षकाला मारहाण
पुणे : हातात काठ्या घेऊन रस्त्याने आरडाओरडा करत निघालेल्यांना शांत जाण्यास सांगितले म्हणून एका सहायक पोलीस निरीक्षकालाच शिवीगाळ करत काठीने मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे.
किशोर लक्ष्मण खंडागळे (वय १८, रा. फातिमानगर), सनी रणजित टाक (वय २४), शैलेश रविकांत पुणेकर (वय २२, रा. मार्केट यार्ड), आकाश शशिकांत जाधव (वय २६, रा. कोंढवा) या चौघांना अटक केली आहे. नविद शेख (रा. वानवडी) याच्यासह ५ जणांच्या विरुद्ध सरकारी कामात अडथळा निर्माण करून पोलीस अधिकाऱ्यास मारहाण केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी वाहतूक शाखेच्या सहायक पोलीस निरीक्षकांनी वानवडी पोलिसांकडे फिर्याद आहे. ही घटना भारतीय पोस्ट ऑफिस स्टेव्हली रोड परिसरात ३१ जानेवारी रोजी रात्री पावणेआठच्या सुमारास घडली.
फिर्यादी हे वानवडी वाहतूक विभागात माईक एक या पदावर कार्यरत आहेत. ३१ जानेवारी रोजी ते स्टेव्हली रोड परिसरात कार्यरत होते. त्यावेळी दुचाकीवरून काही तरुण हातात काठ्या घेऊन आरडाओरडा करत रस्त्याने काठी घासत निघाल्याचे त्यांना दिसले. त्यामुळे त्यांनी आरोपींना तुमच्या गोंधळात कोणीतरी खाली पडून जखमी होईल, असे सांगितले. मात्र असे सांगितल्याचा राग आल्याने पाच जणांनी फिर्यादी यांना शिवीगाळ करून काठीने मारहाण केली. तसेच ते करत असलेल्या सरकारी कामात अडथळा निर्माण केली. तपास सहायक पोलीस निरीक्षक कांबळे करीत आहेत.
-----------------------------------