शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

कोयता घेऊन तो तिच्यामागे धावला, अन्...; सदाशिव पेठेत एकतर्फी प्रेमातून तरुणीवर प्राणघातक हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2023 14:55 IST

प्रेमाला नकार दिल्याने चिडलेल्या तरुणाने या तरुणीचा पाठलाग करत तिच्यावर कोयत्याने वार केले

पुणे : दर्शना पवार हत्याप्रकरण ताजे असताना पुण्याच्या सदाशिव पेठेत धक्कादायक घटना घडली आहे. महाविद्यालयीन तरुणीवर पुण्यातील सदाशिव पेठ एकतर्फी प्रेमातून प्राणघातक हल्ला करण्यात आला. घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास सदाशिव पेठेतील पेरू गेट पोलीस चौकी पासून अवघ्या काही अंतरावर हा प्रकार घडला. प्रेमाला नकार दिल्याने चिडलेल्या तरुणाने या तरुणीचा पाठलाग करत तिच्यावर कोयत्याने वार केले. अचानक झालेल्या या हल्ल्याने ही तरुणी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर पुना हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत. या घटनेनंतर तरुणाला जमावाने चांगलाच चोप दिला. आणि त्यानंतर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत. 

या धक्कादायक घटनेत तरुणी आणि तिचा मित्र गाडीवरून जाताना दिसत आहेत. त्यावेळी अचानक आरोपी तरुण त्यांच्या शेजारी येऊन अडवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांच्यामध्ये बाचाबाची झाल्याचेही व्हिडिओच्या माध्यमातून समोर आले आहे. गाडीवरचा तरुण लगेच उतरून आरोपी तरुणाला ढकलताना दिसून आले आहे. तेवढ्यात आरोपीने कोयता काढून वार करण्यास सुरुवात केली आहे. त्यावेळी मुलीबरोबर असणारा तरुण आरोपीपासून लांब गेला आहे.  आणि आरोपी कोयता घेऊन तरुणीच्या मागे धावत जाताना दिसत आहे. पुढे जाऊन आरोपीने तरुणीवर प्राणघातक हल्लाही केला आहे. या हल्ल्यात ती गंभीर जखमी झाली आहे. हे घडत असताना आजूबाजूच्या नागरिकांनी तरुणाला पकडण्याचा प्रयत्न केला. परंतु तरुण जोरजोरात कोयता फिरवू लागला आहे. त्यानंतर जमावाने तरुणाला पकडून चांगलाच चोप दिल्याचे दिसून आले आहे.   

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसStudentविद्यार्थीCrime Newsगुन्हेगारीArrestअटकcollegeमहाविद्यालय