शहरं
Join us  
Trending Stories
1
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
2
पश्चिम बंगाल निवडणुकीत मोठा राडा, ईव्हीएमवरील भाजपच्या बटणावर 'टेप'! मतदान थांबलं, आयोगाकडून फेरमतदानाचे संकेत
3
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
4
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
5
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
6
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
7
लग्नाला नकार दिल्याच्या रागातून प्रेयसीसह तिच्या आईची हत्या; दुहेरी हत्याकांडाने विरार हादरले
8
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
9
आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे आईसह बाळाला जीवनदान; कल्याण रेल्वे स्थानकावरील घटना
10
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
11
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
12
लग्नासाठी तयार व्हायला नवरी ब्युटी पार्लरमध्ये गेली अन् घडलं आक्रित; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
13
IPL 2026: वैभव सूर्यवंशी असेच षटकार मारत राहिला तर मोडणार ख्रिस गेलचा १४ वर्ष जुना विक्रम
14
पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन?
15
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
16
सरकारी नोकरीत रिजेक्टचा ठपका; मग एका रात्रीत 'करोडपती' होऊन विदर्भकर IPL स्टार कसा बनला?
17
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
18
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
19
भ्रष्टाचाराची तक्रार केली, ग्राम प्रमुखाला जेव्हा कळलं तेव्हा झाला 'मोठ्ठा कांड'! काय घडलं?
20
Travel Tips: फिरण्याची आवड आहे पण खिशाला परवडत नाही? जगभ्रमंतीची 'अशी' फिटवा हौस 
Daily Top 2Weekly Top 5

औषधविक्रेत्यावर प्राणघातक हल्ला

By admin | Updated: June 22, 2015 04:35 IST

नाना पेठ येथील एका औषधविक्रेत्याने डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय झोपेच्या गोळ्यांची औषधे देण्यास नकार दिल्याच्या रागातून एका माथेफिरूने त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला चढविला.

पुणे : नाना पेठ येथील एका औषधविक्रेत्याने डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय झोपेच्या गोळ्यांची औषधे देण्यास नकार दिल्याच्या रागातून एका माथेफिरूने त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला चढविला. शनिवारी रात्री ही घटना घडली़ या प्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मेडिकलमधील सीसीटीव्हीमध्ये हल्ल्याची सर्व घटना रेकॉर्ड झाली आहे.गणेश दरेकर यांचे नाना पेठेमध्ये न्यू सेव्ह मेडिकल नावाचे औषधविक्रीचे दुकान आहे. शनिवारी रात्री ते दुकानात असताना एक तरुण त्यांच्याकडे आला. शेड्युल्ड एक्स अंतर्गत असलेल्या रिस्टाइल या झोपेच्या गोळ्या देण्याची मागणी त्याने केली. मात्र, त्याच्याकडे डॉक्टरांची चिठ्ठी नसल्याने त्याला या गोळ्या देण्यास दरेकर यांनी नकार दिला. त्यामुळे चिडून त्याने त्याच्याकडील कोयता काढून दरेकर यांच्यावर हल्ला चढविला. त्या वेळी दरेकरांनी आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. त्यांचा आवाज ऐकून आजूबाजूचे नागरिक त्यांच्या मदतीला आले. त्या वेळी त्या तरुणाने पळ काढला. दरेकर यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयामध्ये दाखल केले. समर्थ पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३२६ अन्वये माथेफिरू तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माथेफिरू तरुणाला झोपेच्या गोळ्यांची नशा करण्याचे व्यसन असण्याची शक्यता आहे. त्यातून चिडून त्याने हा प्रकार केला असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मेडिकलमधील सीसीटीव्ही फुटेजमध्ये तो तरुण कैद झाला आहे. त्याआधारे त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न समर्थ ठाण्याच्या पोलिसांकडून केला जात आहे.औषधविक्रेत्यावर विनाकारण झालेल्या हल्ल्यामुळे औषधविक्रेत्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. केमिस्ट असोसिएशन आॅफ पुणे डिस्ट्रिक्ट या संघटनेच्या वतीने या घटनेचा निषेध करण्यात आला आहे. माथेफिरू हल्लेखोराला तातडीने अटक करण्याची मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. समाजाच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या औषधविक्रेत्यांवर हल्ला होणे गंभीर बाब असल्याचे संघटनेचे कार्यकारिणी सदस्य नंदकुमार सांडभोर आणि संजय बिबवे यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)