मारहाण प्रकरणी कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2020 04:27 IST2020-11-26T04:27:56+5:302020-11-26T04:27:56+5:30
पुणे : पूर्वी झालेल्या भांडणाच्या रागातून एकाला मारहाण करणाऱ्या दोघा भावांना कोथरूड पोलिसांनी अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले ...

मारहाण प्रकरणी कोठडी
पुणे : पूर्वी झालेल्या भांडणाच्या रागातून एकाला मारहाण करणाऱ्या दोघा भावांना कोथरूड पोलिसांनी अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. किरण शिवाजी साठे (वय २९) आणि सूरज शिवाजी साठे (वय २६, दोघेही रा. शास्त्रीनगर, कोथरूड) असे अटक करण्यात आलेल्यांचे नाव आहे. या प्रकरणी कोथरूड येथील एका महिलेने फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांच्या मुलाला किरण आणि सूरज यांनी पूर्वी झालेल्या भांडणाच्या रागातून मारहाण केली. तसेच त्यांच्या मुलीचा विनयभंग केला. यावेळी फिर्यादी व त्यांची मुलगी भांडण सोडविण्यासाठी गेले असताना त्यांनाही आरोपींनी मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.