शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
4
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
5
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
7
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
8
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
9
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
10
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
11
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
13
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
14
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
15
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
16
आयोग नव्हे, मतदारच राजा !
17
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
18
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
19
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
20
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश

सुरक्षारक्षकाचा खुन करणा-यास अटक, लहान मुलाच्या फोटोवरुन मारेक-याची पटली ओळख

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2018 21:30 IST

भंगार चोरी करण्यामध्ये अडथळा येऊ नये, यासाठी सुरक्षारक्षकाचा खुन करणा-या एकास भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे. शकील बाबु तांबोळी (वय ३५, रा़ गोकुळनगर, धानोरी, विश्रांतवाडी, पूर्वी शिवापूरवाडा, कोंढणपूर फाटा) असे त्याचे नाव आहे.

पुणे : भंगार चोरी करण्यामध्ये अडथळा येऊ नये, यासाठी सुरक्षारक्षकाचा खुन करणा-या एकास भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे. शकील बाबु तांबोळी (वय ३५, रा़ गोकुळनगर, धानोरी, विश्रांतवाडी, पूर्वी शिवापूरवाडा, कोंढणपूर फाटा) असे त्याचे नाव आहे. शकील तांबोळी हा पूर्वी रतन मोटर्स येथे सुरक्षारक्षक म्हणून कामाला होता. त्याला तेथून काढून टाकण्यात आले होते.

कात्रजच्या जुन्या बोगद्याजवळील गुजरवाडी फाटा येथील रतन मोटर्स या शोरूममधील सुरक्षा रक्षक आरिफ कासमखान पठाण (वय ५५, रा गुजरवाडी) यांच्या  चेहरा आणि गळ्यावर  वार करून खून केल्याचा प्रकार रविवारी दुपारी उघडकीस आला. तेथून जवळच असलेल्या एका सीसीटीव्हीमध्ये संशयितांची छायाचित्रे कैद झाली होती. त्यावरुन भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे कर्मचारी अमोल पवार व कुंदन शिंदे यांनी विविध तांत्रिक बाबींचा अभ्यास करुन एका लहान मुलाचे छायाचित्र संपूर्ण कात्रज परिसरात फिरुन लोकांना दाखविले. या मुलाची ओळख पटविल्यानंतर त्यातून शकील तांबोळी यानेच हा खुन केल्याचे निष्पन्न झाले. शकील तांबोळी व त्याचे वडील या रतन मोटर्स येथे पूर्वी सुरक्षारक्षक म्हणून काम करीत होते. गुन्हा केल्यानंतर तीन दिवस आरोपी सतत ठिकाणे बदलत होता. हवालदार चंद्रकांत फडतरे यांना आरोपी धानोरी भागात असल्याची माहिती मिळाली़ पोलिसांनी सापळा रचून बुधवारी सकाळी त्याला पकडले. घटनेच्या दिवशी सायंकाळी आरिफ पठाण यांचे बरोबर तांबोळीचा वाद झाला होता़ त्यानंतर त्याने एका अल्पवयीन मुलाच्या साथीने भंगार चोरीत अडथळा होऊ नये, म्हणून पठाण यांचा खुन केल्याची कबुली दिली. 

ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक कमलाकर ताकवले, पोलीस निरीक्षक राजकुमार वाघचवरे, तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक दत्ताजीराव मोहिते, शिवदास गायकवाड, कर्मचारी चंद्रकांत फडतरे, कृष्णा निढाळकर, सचिन ढवळे, अमोल पवार, कुंदन शिंदे, प्रणव संकपाळ, उज्वल मोकाशी, सरफराज देशमुख, अभिजित रत्नपारखी, महेश मंडलिक, गणेश चिंचकर, शिवदत्त गायकवाड, जगदिश खेडेकर, विनोद भंडलकर, पोलीस मित्र योगेश बळी यांनी केली आहे.

७२ तपासात गुन्हेगार ताब्यात

कात्रज येथील रतन मोटर्समध्ये पठाण यांचा खुन झाल्याचे रविवारी सकाळी उघडकीस आल्यानंतर भारती विद्यापीठ पोलिसांनी अविरत परिश्रम करुन सर्व तांत्रिक कौशल्याचा वापर करुन ७२ तासात गुन्हेगाराला पकडण्यात यश मिळविले. रात्रीच्या अंधारात सीसीटीव्हीमध्ये अतिशय लांबून आणि अस्पष्ट दिसणा-या छायाचित्राचा आधार घेऊन आरोपीबरोबरच्या अल्पवयीन मुलांची ओळख पटविण्यासाठी त्यांनी संपूर्ण कात्रज परिसर पिंजून काढला. त्यासाठी पोलीस स्टेशन स्तरावर ४ पथके तयार केली. तांत्रिक माहितीद्वारे आरोपीचा ठावठिकाणा शोधून काढून त्याला शहराच्या दुस-या टोकावरील धानोरी येथून पकडण्यात यश मिळविले.

टॅग्स :Crimeगुन्हाPuneपुणे