Pune Crime: गाडी घासल्याचा जाब विचारला असता वकिल महिलेसह पतीवर केले कोयत्याने वार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2021 12:24 IST2021-10-05T12:21:29+5:302021-10-05T12:24:23+5:30
दोघांवर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Pune Crime: गाडी घासल्याचा जाब विचारला असता वकिल महिलेसह पतीवर केले कोयत्याने वार
धनकवडी : कारला गाडी घासल्याचा जाब विचारला म्हणून दांम्पत्यावर कोयत्याने वार करुन जीवे ठार मार ण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही घटना आंबेगाव बुद्रुक येथील जय शिवाजी मंडळ येथे घडली.याप्रकरणी रितेश कोंढरे, राहणार बिबवेवाडी व त्याच्या दोन साथीदारांवर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार फिर्यादी २८ वर्षीय महिला असून त्या वकिल आहेत. त्या पतीसह कारने चालल्या असताना, त्यांच्या कारला रितेश कोंढरे व त्यांच्या साथीदारांची गाडी घासून गेली. फिर्यादीने त्यांना जाब विचारला असता, रितेश कोंढरेने त्यांच्या पतीवर कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न केला. फिर्यादीने हा वार हाताने अडवला. यामध्ये त्या जखमी झाल्या. यानंतर त्यांना व पतीला आरोपींनी लाकडी बॅटने मारहाण केली. त्यांच्या गाडीची काच फोडून नूकसान केले. यानंतरत्यांना तुमची विकेट घेतो अशी धमकी दिली. याप्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक आशिष कवठेकर करत आहेत.