शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Ashadi Ekadashi 2025 : यंदा फेसबुक दिंडीमध्ये 'वारी अभिजात मराठीची' मोहीम

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 13:06 IST

मराठीची ऐतिहासिक परंपरा, साहित्यिक योगदान आणि सांस्कृतिक वारसा या क्षेत्रामधील महत्त्व उलगडणार

बारामती : संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळ्याची इत्यंभूत माहिती इंटरनेटच्या माध्यमातून जगभरात पोहोचविण्यासाठी गेल्या १५ वर्षांपासून फेसबुक दिंडी कार्यरत आहे. फेसबुक दिंडी नेहमीच पंढरीच्या वारीतील ई- वारकऱ्यांसाठी पालखीचे फोटो, व्हिडीओ तसेच लाईव्ह अपडेट्स सोबतच सामाजिक बांधिलकी जपण्याच्या दृष्टिकोनातून नवनवीन उपक्रम घेऊन येत असते. टीम फेसबुक दिंडी यावर्षी 'वारी अभिजात मराठीची' या मोहिमेतून  मराठीची ऐतिहासिक परंपरा, साहित्यिक योगदान आणि सांस्कृतिक वारसा या क्षेत्रामधील महत्त्व यंदाच्या वारीमध्ये मांडणार आहोत.

यावर्षी जगद्‌गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे ३४० वे वर्ष आणि आपल्या फेसबुक दिंडीचे हे १५ वे वर्ष. फेसबुक दिंडीतर्फे दरवर्षी नेहमीच्या वारीच्या 'अपडेट' सोबत सामाजिक उपक्रम राबविण्यात येतो. यंदाच्या वर्षी फेसबुक दिंडीतर्फे 'वारी अभिजात मराठीची' ही मोहीम राबविण्यात येणार आहे. माऊली म्हणतात, 'जैसी दीपांमाझि दिवटी। कां तिर्थीमाझि पूर्णिमा गोमटी। तैसी भाषांमध्ये मर्हाटी। सर्वोत्तम।।' मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून देण्यासाठी संत साहित्याचे योगदान अत्यंत मोलाचे आहे. संत ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव, एकनाथ यांनी तत्त्वज्ञान, अध्यात्म आणि सामाजिक समतेचे विचार लोकसुलभ मराठीत मांडले. त्यांच्या अभंग, ओव्या व भारुडांमुळे मराठी भाषेचा लय, ताल, शब्दसंपदा आणि भावनिक पोत समृद्ध झाला. संत साहित्यामुळे मराठी भाषेला गहिरेपणा, सामाजिक मूल्यं आणि सांस्कृतिक वारसा लाभला जो अभिजाततेचा मुख्य आधार ठरतो.

आपल्या माय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवणे म्हणजे साहित्य, कला आणि संस्कृतीच्या गौरवाची मान्यता मिळणे. मराठी भाषेला अभिजात दर्जा दिला गेल्यामुळे तिची ऐतिहासिक परंपरा, साहित्यिक योगदान आणि सांस्कृतिक वारसा यांना मान्यता मिळाली. अभिजात भाषांच्या यादीत समावेश झाल्यामुळे आपल्या मराठी भाषेची ओळख जागतिक स्तरावर वाढली.

नवीन गाणे प्रदर्शित होणारमराठी भाषा केवळ संवाद साधण्याचे एक साधन नाही, तर ती एक सांस्कृतिक ओळख, सामाजिक एकता आणि शैक्षणिक समृद्धीचे प्रतीक आहे. यामुळे मराठी भाषेच्या संवर्धनाकडे लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे. याचसोबत यंदाचे फेसबुक दिंडीचे नवीन गाणे 'चला रे पाहू सोहळा पंढरीचा' हे देखील लवकरच प्रदर्शित होणार आहे. याचे गीत लेखन व संगीत आनंद ओक यांनी केले आहे. यासाठी फेसबुक दिंडी टीमचे सदस्य स्वप्नील मोरे, सुरज दिघे, अमोल निंबाळकर, संतोष पाटील, अमोल गावडे, मंदार जाधव, सागर गंधारे, ओंकार महामुनी, निखिल पवार, सुमित चव्हाण कार्यरत आहेत.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडAshadhi Ekadashiआषाढी एकादशीashadhi wariआषाढी एकादशीची वारी 2022