शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
2
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
3
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
4
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
5
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
6
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
7
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
8
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
9
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
10
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?
11
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
12
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
13
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
14
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
15
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
16
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
17
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
18
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
19
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
20
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती

तुकोबारायांचा पालखी सोहळा इंदापुर तालुक्यात दाखल;शुक्रवारचा मुक्काम सणसरमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2025 20:33 IST

संतश्रेष्ठ संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळ्याने शुक्रवारी (दि. २७) सायंकाळी इंदापुर तालुक्यात प्रवेश केला. तालुक्यात सणसर गावात पालखी सोहळा पहिल्या मुक्कामी विसावला. काटेवाडीतून प्रस्थान ठेवल्यानंतर पालखी सोहळ्याचे भवानीनगर येथे आगमन झाले.

सणसर : संतश्रेष्ठ संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळ्याने शुक्रवारी (दि. २७) सायंकाळी इंदापुर तालुक्यात प्रवेश केला. तालुक्यात सणसर गावात पालखी सोहळा पहिल्या मुक्कामी विसावला. काटेवाडीतून  प्रस्थान ठेवल्यानंतर पालखी सोहळ्याचे भवानीनगर येथे आगमन झाले.

यावेळी क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे, छत्रपती कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक, उपाध्यक्ष कैलास गावडे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, तहसीलदार जीवन बनसोडे, बाळासाहेब कोळेकर, रामचंद्र निंबाळकर, अनिल काटे, शिवाजीराव निंबाळकर, पृथ्वीराज घोलप, डॉ. योगेश पाटील, बाळासाहेब पाटील, ॲड. रणजीत निंबाळकर, निलेश टिळेकर, प्रशांत दराडे, संतोष मासाळ, विठ्ठल शिंगाडे, अजित नरुटे, सणसरचे सरपंच यशवंत पाटील, खरेदी विक्री संघाचे संचालक अमोल पाटील, कारखान्याचे कार्यकारी संचालक अशोक जाधव यांच्यासह सणसरकांच्या वतीने जोरदार स्वागत करण्यात आले. छत्रपती कारखान्याच्या वतीने उभारण्यात आलेल्या दर्शन मंडपात पालखी भाविकांच्या दर्शनासाठी विसावली. त्यानंतर सोहळा सणसरच्या दिशेने मार्गस्थ झाला.पालखीच्या तळावर यंदा शासनाने जर्मन तंत्रज्ञानावर आधारित भव्य असे दोन मंडप उभारले आहेत. पालखीच्या इमारतीतील स्टेजवर फुलांनी सजावट आकर्षण ठरले. पालखी सोहळ्यातील आरतीचा मान गावच्या सरंपचाना असतो. मात्र, सणसरचे सरपंच यशवंत पाटील यांनी मात्र यावर्षी हा पायंडा बदलला. पाटील यांच्या संकल्पनेतून दहावीमध्ये उत्तीर्ण होऊन पहिल्या तीन नंबर मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या हस्ते आरती घेण्यात आली. यावेळी भवानीनगर येथे डाॅ. राकेश मेहता, डाॅ. शीतल मेहता यांनी यशश्री हाॅस्पिटलच्या वतीने वारकरी भाविकांची आरोग्य तपासणी केली. तसेच अन्नदानाचा उपक्रम राबविला. आझाद तरुण मंडळाच्या वतीने चहावाटप करण्यात आले.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडIndian Festivalsभारतीय उत्सव-सणPandharpurपंढरपूरPandharpur Wariपंढरपूर वारीAshadhi Ekadashiआषाढी एकादशी २०२५