शहरं
Join us  
Trending Stories
1
पोस्टरमुळे समोर आला डॉक्टरांचा दहशतवादी कट; स्फोटकांचा तपास यशस्वी, पण दिल्लीत कशी झाली चूक?
2
एके-47 ठेवणाऱ्या डॉ. शाहीनचे थेट महाराष्ट्राशी कनेक्शन; जैशच्या महिला विंगची निघाली मास्टरमाईंड
3
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
4
Govinda Hospitalised : ६१ वर्षीय गोविंदाची अचानक तब्येत बिघडली, झाला बेशुद्ध, जुहूच्या रुग्णालयात दाखल
5
आजचे राशीभविष्य, १२ नोव्हेंबर २०२५: आजचा दिवस आनंदी; पण 'या' राशीला स्त्रीमुळे अडचणीचा धोका
6
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, डॉक्टरांनी दिले हेल्थ अपडेट
7
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
8
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
9
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
10
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
11
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
12
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
13
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
14
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
15
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
16
महामुंबईसाठी पद्मश्री पुरस्कार विजेत्यांचा जाहीरनामा
17
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
18
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
19
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
20
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय

कवि मोरोपंतांच्या बारामतीत तुकोबांचा पालखी सोहळा विसावला; अवघी बारामती नगरी विठ्ठलनामात दंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 19:42 IST

वारकरी भाविकांसह अवघी बारामती 'ज्ञानोबा माऊली तुकाराम..ज्ञानोबा माऊली तुकाराम, विठुनामाच्या जयघोषात भक्तिरसाने चिंब झाल्याचे चित्र होते.

बारामती - संतश्रेष्ठ श्रीतुकाराम महाराजांचा पालखी सोहळा गुरुवारी(दि २ ६) बारामती शहरातील शारदा प्रांगणात विसावला. यावेळी वरुणराजाबरोबरच टाळ-मृदंगाचा गजर, गुलाबपाण्याचा शिडकाव्याचा सुगंध आणि ज्ञानबा तुकाराम विठोबाच्या जयघोषाने अवघा आसमंत भारावला. वारकरी भाविकांसह अवघी बारामती 'ज्ञानोबा माऊली तुकाराम..ज्ञानोबा माऊली तुकाराम, विठुनामाच्या जयघोषात  भक्तिरसाने चिंब झाल्याचे चित्र होते. संपूर्ण बारामती वारीमय झालेली पाहावयास मिळाली. वेशीवर बारामतीतील पाटस रस्त्यावरील देशमुख चौकात पालिकेकडून भव्य व्यासपीठ पालखी स्वागतासाठी उभारण्यात आले होते.सोहळ्याच्या स्वागतासाठी नगरपालिकेच्या वतीने   प्रत्येक चौकात केलेल्या फुलांच्या सजावटीद्वारे बारामती नगरी नववधुप्रमाणे सजली होती. यावेळी खासदार सुनेत्रा पवार, प्रांताधिकारी वैभव नावडकर, तहसीलदार गणेश शिंदे, गट विकास अधिकारी डॉ. अनिल बागल,मुख्याधिकारी पंकज भुसे, उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन राठोड, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सुरेंद्र निकम, पोलिस निरीक्षक , पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव, बारामती बँकेचे अध्यक्ष सचिन सातव, ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष जय पाटील आदींनी पालखी सोहळ्याचे स्वागत केले.पालखी सोहळ्याच्या आगमनापुर्वी झेंडेकरी, विणेकरी, टाळकरी, तुळशीवृंदावन डोक्यावर घेतलेल्या महिला वारकऱ्यांचा सोहळ्यातील शिस्तबद्ध सहभागाने बारामतीकरांचे लक्ष वेधले. सायंकाळी सातच्या सुमारास शारदा प्रांगणातील भव्य शामियानात सोहळा मुक्कामी विसावला. यावेळी खासदार सुनेत्रा पवार यांच्या हस्ते आरती करण्यात आली. पालखी दर्शनासाठी रात्री उशिरापर्यंत रांगा लागल्या होत्या. पालखी सोहळा शनिवारी इंदापूर तालुक्यातील सणसर येथील प्रस्थान ठेवणार आहे.तत्पुर्वी काटेवाडी येथे धोतराच्या पायघड्या अंथरुन पालखी सोहळा स्वागत होणार आहे.दुपारी विसाव्यानंतर पालखी रथाभोवती मेंढ्यांचे वैशिष्ठ्यपुर्ण रींगणसोहळा पार पडणार आहे. नगरपरिषेदेकडून वारकऱ्यांसाठी सुविधा आषाढी वारीकरीता येणाऱ्या वारकऱ्यांना सोई-सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. 'हरित वारी-सुरक्षित वारी' च्या माध्यमातून शहरात वृक्षारोपण करण्यात येत आहे. शहरात प्लास्टिकमुक्त बारामती, प्रदूषणमुक्त वारी व पर्यावरण हरित संतुलनासाठी जनजागृतीविषयक उपक्रम राबविण्यात  आला. शहरात कचरा कुंडी, पोलीस मदत केंद्र, अग्निशमन यंत्रणा, रुग्णवाहिका, सूचना फलक, आपत्ती व्यवस्थापन कक्ष आदी व्यवस्था करण्यात आली आहे.तसेच ध्वनीक्षेपकाद्वारे सूचनाही देण्यात येत आहे. बारामती शहरात चौकाचौकात विविध संस्था संघटना यांच्याकडून पालखी रथाचे व दिंड्याचे स्वागत करण्यासाठी मंडप उभारण्यात आले आहेत. 

टॅग्स :ashadhi wariआषाढी एकादशी वारी 2025Pandharpur Wariपंढरपूर वारीAshadhi Ekadashiआषाढी एकादशी २०२५PandharpurपंढरपूरIndian Festivalsभारतीय उत्सव-सण