Ashadhi Wari: पिंपळीत संत सोपानकाका महाराज पालखी सोहळ्यास मेंढ्यांचे भव्य रिंगण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2023 01:17 PM2023-06-22T13:17:24+5:302023-06-22T13:18:58+5:30

पिंपळी (पुणे) : पिंपळीत संत सोपानकाका महाराज पालखी सोहळ्याच्या आगमनाने वातावरण भक्तिमय झाले होते. गावात सोहळ्याचा आनंदोत्सव साजरा झाला. ...

Ashadhi Wari: Grand arena of sheep at Sant Sopankaka Maharaj Palkhi ceremony in Pimpli | Ashadhi Wari: पिंपळीत संत सोपानकाका महाराज पालखी सोहळ्यास मेंढ्यांचे भव्य रिंगण

Ashadhi Wari: पिंपळीत संत सोपानकाका महाराज पालखी सोहळ्यास मेंढ्यांचे भव्य रिंगण

googlenewsNext

पिंपळी (पुणे) : पिंपळीत संत सोपानकाका महाराज पालखी सोहळ्याच्या आगमनाने वातावरण भक्तिमय झाले होते. गावात सोहळ्याचा आनंदोत्सव साजरा झाला. संत सोपानकाका महाराज पालखी सोहळा व बैलजोडी आणि अश्व यांचा स्वागत सन्मान सरपंच मंगल हरिभाऊ केसकर, उपसरपंच अश्विनी सुनिल बनसोडे यांचे हस्ते आरती करून व हार अर्पण करून स्वागत करण्यात आले.

त्रिगुण गोसावी महाराज व चोपदार मनोज रणवरे महाराज, सिद्धेश शिंदे महाराज यांचे स्वागत छत्रपती कारखाना संचालक संतोषराव ढवाण पाटील व हरिभाऊ केसकर,आबासाहेब देवकाते पाटील यांनी केले. संत सोपानकाका महाराज यांच्या पादुका ग्रामस्थांना दर्शनासाठी मारुती मंदिर देवस्थान याठिकाणी ठेवण्यात आले होते. समस्त पालखी सोहळ्यास जेवणाची व्यवस्था सभामंडपात करण्यात आली होती. पालखी सोहळ्याचे उत्स्फूर्तपणे स्वागत केल्याबद्दल त्रिगुण गोसावी महाराज यांनी ग्रामस्थ व ग्रामपंचायतीचे आभार मानले. पालखी सोहळ्यास ग्रामस्थांनी साश्रू नयनांनी निरोप दिला.

पिंपळीतील मेंढपाळ शेतकरी सतिश केसकर, तानाजी केसकर, उत्तम केसकर, आबासो केसकर, यशवंत केसकर,अर्जुन केसकर,मारुती केसकर आदी मेंढपाळांच्या मेंढ्यांनी रिंगण करण्यात आले. याप्रसंगी गावचे सरपंच मंगल केसकर, उपसरपंच अश्विनी बनसोडे, छत्रपती कारखाना संचालक संतोषराव ढवाण पाटील, बारामती खरेदी विक्री संघ संचालक नितीन देवकाते पाटील, पोलीस पाटील मोहनराव बनकर, सदस्य आबासाहेब देवकाते पाटील, राहुल बनकर, उमेश पिसाळ, रमेशराव देवकाते, सुनिल बनसोडे, ग्रामविकास अधिकारी बाळासाहेब भोईटे, अशोक देवकाते पाटील, अशोकराव ढवाण पाटील, नाना मदने,नवनाथ देवकाते पाटील, बापूराव केसकर, बाळासाहेब पाटील, कल्याण राजगुरू, कालिदास खोमणे, महेश चौधरी, मारुती बाबर, धूळबापू ठेंगल, विजय बाबर, सूर्यकांत पिसाळ आदी स्वागत प्रसंगी उपस्थित होते.

Web Title: Ashadhi Wari: Grand arena of sheep at Sant Sopankaka Maharaj Palkhi ceremony in Pimpli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.