शहरं
Join us  
Trending Stories
1
जपानमधील एका एक्सप्रेसवेवर ५० हून अधिक वाहनांची टक्कर, एकाचा मृत्यू; २६ जण जखमी
2
Nitish Kumar : Video - मुख्यमंत्री नितीश कुमारांच्या ताफ्यातील कारची DSP ना धडक; थोडक्यात वाचला जीव
3
काँग्रेसची ४८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर; २९ नवे चेहरे रिंगणात, पहिल्या यादीत कोणाची नावे?
4
PNB Fraud: पंजाब नॅशनल बँकेत पुन्हा झाला ₹२,४३४ कोटींचा घोटाळा; RBI ला दिली माहिती, कोणावर आहे आरोप?
5
पिंपरीत आम्ही १२५ जागा जिंकू, अजित पवारांना फक्त तीनच जागा मिळणार', भाजपा आमदाराचा दावा
6
फोननंतर विजयकुमारांचा बंडाचा झेंडा; गोरे, तडवळकर मुंबईकडे, उमेदवारीवरून रणकंदन
7
महाराष्ट्रभर पारा आणखी घसरणार! नवीन वर्षाचे स्वागत थंडीच्या कडाक्यानेच, तयार रहा...
8
आता कॅब बुक करताना मिळणार महिला ड्रायव्हर निवडण्याचा पर्याय, महिलांच्या सुरक्षेसाठा सरकारचा मोठं पाऊल
9
Salman Khan Birthday: मध्यरात्री पनवेलच्या फार्महाऊसवर सलमानने केलं वाढदिवसाचं जोरदार सेलिब्रेशन, व्हिडीओ व्हायरल
10
बांगलादेशमध्ये प्रसिद्ध गायक जेम्सच्या संगीत कार्यक्रमावर जमावाने केला हल्ला, अनेक जण जखमी
11
अमेरिका नाही, या मुस्लिम देशाने २०२५ मध्ये सर्वाधिक भारतीयांना बाहेर काढले; रशियाचाही समावेश
12
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २७ डिसेंबर २०२५: अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल, प्राप्तीत वाढ होईल
13
संपादकीय: कुऱ्हाड - झाडांवर, निष्ठेवरही! महाजनांची मुजोरी आता कार्यकर्त्यांवरही...
14
मुंबई निवडणुकीत डॅडी...! अरुण गवळीच्या कन्या रिंगणात; भावजईचा शिंदेसेनेत प्रवेश
15
महापालिका रणधुमाळी : सत्तेत सोबत असलेले अजित पवार निवडणुकीत राज्यभर विरोधात
16
कबुतरांना खाद्य दिल्याने दंड; दादरचा व्यावसायिक दाेषी; दंडाचे पहिलेच प्रकरण 
17
नवनिर्वाचित शिंदेसेना नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या; घराजवळच पाच जणांकडून धारदार शस्त्रांनी वार 
18
उद्धव-राज एकत्र आल्याने ६७ प्रभागांत फरक पडणार; २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पडलेल्या मतांवरून चित्र स्पष्ट
19
युतीच्या चर्चा फिसकटल्या? आता बंडखोरी टाळण्यासाठी विलंब
20
तुम्ही लावता त्या अगरबत्तीतून आता येणार नाही ‘विषारी’ धूर! केंद्र सरकारने कठोर पाऊल, घातक रसायनांवर बंदी  
Daily Top 2Weekly Top 5

सोपानकाका चरणी...अश्व धावले रिंगणी..! सोमेश्वरनगर येथे पार पडला संत सोपानकाका पालखी सोहळ्याचा रिंगण सोहळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 19:39 IST

- सोमेश्वरनगर येथील मु. सा. काकडे महाविद्यालयाच्या प्रांगणात हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितील डोळ्यांचे पारणे फेडणारे पहिला अश्व रिंगण सोहळा पार पडला.

- महेश जगताप

सोमेश्वरनगर : सोपानकाका चरणी....! अश्व धावले रिंगणी..! श्री संत सोपानदेव पालखी सोहळ्यातील पाहिला अश्व रिंगण सोहळा सोमेश्वरनगर येथे पार पडला. सोमेश्वर कारखान्यावर विसावला.

सोमेश्वरनगर येथील मु. सा. काकडे महाविद्यालयाच्या प्रांगणात हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितील डोळ्यांचे पारणे फेडणारे पहिला अश्व रिंगण सोहळा पार पडला. निंबुत येथून सोहळा न्याहरीसाठी निंबुत छपरी येथे विसावला. याठिकाणी ग्रामस्थांनी पालखीचे स्वागत केले. वाघळवाडी येथे पालखी अंबामाता मंदिर या ठिकाणी विसाव्यासाठी ठेवण्यात आली. ज्ञानोबा-तुकोबांचा जयघोष करीत गावकऱ्यांनी रस्त्याच्या दुतर्फा रांगोळी काढून, नीरा-बारामती रस्त्यावर स्वागत कमानी उभारल्या होत्या. सरपंच ॲड. हेमंत गायकवाड, उपसरपंच तुषार संकुडे, गणेश जाधव, अविनाश सावंत, अजिंक्य सावंत, बबलू सकुंडे, ग्रामविकास अधिकारी संजयकुमार भोसले उपस्थित होते. दुपारी चार वाजता पालखी रिंगणासाठी मु.सा. काकडे महाविद्यालयात आली. पहिले अश्वरिंगण पाहण्यासाठी हजारो वारकऱ्यांनी आणि सोमेश्वर परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती. अश्वाने रिंगण पूर्ण करताच भक्तिमय वातावरणात विठुनामाचा गजर करण्यात आला.

प्रथम सोपानकाकांच्या पादुकांचे रिंगण पूर्ण झाले. त्यानंतर मानाच्या अश्वाने दोनवेळा रिंगण पूर्ण करीत उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. गोल रिंगण पूर्ण होताच वीणेकरी तसेच तुळशीवृंदावन डोक्यावर घेऊन महिलांनी तसेच विणेकरी, टाळकरी, झेंडेकरी व वडगाव निंबाळकर पोलिसांनी रिंगण पूर्ण केले. पालखी सोहळ्यात जवळपास दीड लाख वारकरी सहभागी झाले आहेत. अशी माहिती सोहळा प्रमुख त्रिगुणमहाराज गोसावी यांनी दिली.

सायंकाळी सहा वाजता पालखी सोहळा मुक्कामासाठी सोमेश्वर कारखान्याच्या छत्रपती शिवाजी महाराज प्रांगणात विसावला. सोहळा प्रमुख त्रिभुवन महाराज गोसावी यांचा कारखान्याच्या वतीने सन्मान करण्यात आला. सोमेश्वरचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, उपाध्यक्ष मिलिंद कांबळे, माजी सभापती प्रमोद काकडे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजवर्धन शिंदे, रमाकांत गायकवाड, डॉ. देवीदास वायदंडे, डॉ. जगनाथ साळवे, सोमेश्वरचे संचालक ऋषिकेश गायकवाड, शैलेश रासकर, लक्ष्मण गोफणे, नीता फरांदे, सतीश सकुंडे, हेमंत गायकवाड, आदींनी पालखीचे स्वागत केले.

टॅग्स :ashadhi wariआषाढी एकादशी वारी 2025Indian Festivalsभारतीय उत्सव-सणPandharpurपंढरपूरAshadhi Ekadashiआषाढी एकादशी २०२५Pandharpur Wariपंढरपूर वारी