शहरं
Join us  
Trending Stories
1
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', ऑपरेशन सिंदूरवरुन PM मोदींची बोचरी टीका
2
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
3
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं
4
राज ठाकरे म्हणाले, आपलीच सत्ता येणार; पण कशी? उद्धवसेनेशी युती करून की स्वबळावर?
5
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
6
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
7
पत्नीशी झाला वाद, पित्याने दोन चिमुकल्यांवर काढला राग! मुलांना वाहत्या नदीत फेकलं अन्...
8
'मस्त राहा, सगळं मस्तच होईल' प्रेमानंद महाराजांनी सांगितले आनंदी जीवनाचे ६ मार्ग!
9
चक्क २० वर्षीय युवकानं बनवला स्वत:चा देश, ४०० जणांना दिलं नागरिकत्व; युरोपियन देश अवाक् झाले
10
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
11
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
12
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं
13
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
14
"कोणी तुम्हाला इच्छेविरोधात हात...", तसल्या सीनबद्दलच्या दृष्टिकोनावर काय म्हणाली मराठी अभिनेत्री?
15
मध्यमवर्गीयांची धाव SIP पर्यंत; पण, देशातील सर्वात श्रीमंत १% लोक करतात 'या' २ गोष्टीत सर्वाधिक गुंतवणूक
16
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
17
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
18
चातुर्मासातील पहिला बुध प्रदोष: कसे करावे व्रत? ‘या’ मंत्रांचा जप करा, महादेव शुभच करतील!
19
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रालयाने केला खुलासा...
20
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?

विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 21:51 IST

- संचेती चाैकात हेलिकाॅप्टरने पुष्पवृष्टी; वरुण राजाच्या हजेरीसह भक्तीरसात पुणेकर चिंब

पुणे : टाळ-मृदंगाच्या गजरात, ‘ज्ञानाेबा-तुकाराम’चा जयघाेष करत लाखाे वारकऱ्यांसह संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांचा पालखी साेहळा शुक्रवारी (दि. २०) सायंकाळी संचेती चाैकात पाेहाेचला. यावेळी पालखी साेहळ्यावर हेलिकाॅप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. त्याचबराेबर वरुण राजानेही हजेरी लावत पुण्यात दाेन्ही पालख्यांचे स्वागत केले. ‘पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम’च्या जयघाेषाने संपुर्ण परिसर दुमदुमला.लाडक्या विठुरायाला भेटण्यासाठी श्रीक्षेत्र पंढरपूरकडे निघालेला लाखाे वारकऱ्यांचा मेळा पुण्यात येताच पुणेकर भक्तिरसात चिंब झाले. त्यातच हलक्या सरी देखील बरसल्या. दरम्यान, जागाे-जागाे ध्वनिक्षेपकावरून अभंगा कानी पडत हाेते. एक-एक करून दिंडीचे शहरात आगमन झाले. संत तुकाेबांचा नगारखाना आणि पाठाेपाठ मानाचा अश्व चाैकात दाखल झाला आणि भाविकांनी एकच गर्दी केली. त्या पाठाेपाठ सायंकाळी ५.१८ वाजता तुकाेबांचा रथ दाखल झाला. चाैकातून थाेडे पुढे येताच धारकरी साेहळ्यात आले आणि भिडे गुरुजी पालखी रथात बसले. पाेलिसांनी माेठ्या बंदाेबस्तात साेहळ्याला मार्ग करून दिला.

त्यानंतर तब्बल २ तास १० मिनिटांनी म्हणजेच ७.२८ वाजता संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी साेहळा संचेती चाैकात दाखल झाला. दर्शनासाठी भाविकांनी एकच गर्दी केली. रात्री उशिरा संत तुकाेबांची पालखी नाना पेठेतील निवडुंगा विठ्ठल मंदिरात, तर संत ज्ञानेश्वरांची पालखी भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरात विसावली.विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥

विठ्ठल अवघ्या भांडवला । विठ्ठल बोला विठ्ठल ॥विठ्ठल सुखा विठ्ठल दुःखा । तुकया मुखा विठ्ठल ॥

संपूर्ण वातावरण विठ्ठलमय झाले आणि पुणेकरांना संत तुकाराम महाराजांच्या वरील अभंगाचा प्रत्यय आला. पालखी साेहळा पुण्यात येणार म्हणून पुणेकरांनी आधीच जय्यत तयारी केली हाेती. वारकऱ्यांच्या सेवेसाठी हजाराे हात सरसावले. जाे-ताे त्याच्या त्याच्या क्षमतेनुसार माउली आणि तुकाेबांच्या चरणी सेवा अर्पण करण्यासाठी आतुर झाला हाेता. राज्य सरकार, महापालिका प्रशासन, पाेलिस यंत्रणा, आराेग्य विभाग यासह विविध सेवाभावी संस्था-संघटनांनी देखील पुढाकार घेतला. संतांच्याच भाषेत सांगायचे तर ‘साधु-संत येती घरा, ताेची दिवाळी दसरा’ अशी पुणेकरांची भावना हाेती.

काय वाणूं आतां न पुरे हे वाणी । मस्तक चरणीं ठेवीतसें ॥ या भावनेने भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. लहानांपासून थाेरापर्यंत सर्वच नामघाेषात तल्लीन झाले. दर्शन हाेताच भाविकांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत हाेता. ‘आनंदाचे डाेही आनंद तरंग, आनंदची अंग आनंदसे’ ही भावना वारकऱ्यांची आणि पुणेकरांची झाली हाेती. पुढील दाेन दिवस संतांचा सहवास लाभणार आणि त्यांची सेवा करायला मिळणार याबद्दल पुणेकर समाधान व्यक्त करीत आहेत. 

पालकांच्या स्वागताला वरुण राजाचीही हजेरी :'ज्ञानोबा - तुकाराम'चा जयघोष करत पालखी सोहळा पुण्यात दाखल होताच हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. त्यानंतर काही क्षणातच वरुण राजांनीही हजेरी लावत पालकांचे स्वागत केले. रिमझिम पावसातही दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी झाली होती.

टॅग्स :ashadhi wariआषाढी एकादशी वारी 2025Maharashtraमहाराष्ट्रPuneपुणेPandharpurपंढरपूरPandharpur Wariपंढरपूर वारी