शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
2
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
3
अमेरिकेत करिअरचे दार उघडणारा H-1B व्हिसा काय आहे? कोणाला मिळतो? जाणून घ्या संपूर्ण माहिती...
4
पुढच्या आठवड्यात येणार IPO चा पाऊस, २२ आयपीओंमध्ये मिळणार गुंतवणूकीची संधी; कोणत्या आहेत कंपन्या?
5
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
6
Hanuman Temple: 'या' मंदिरात हनुमान निद्रावस्थेत, तरीही केवळ दर्शनाने पूर्ण होते भक्तांची प्रत्येक इच्छा 
7
५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?
8
शाहिद आफ्रिदीचं इरफान पठाणला आव्हान, म्हणाला, ‘’मर्द असशील तर…”, मिळालं असं प्रत्युत्तर
9
नागपूरमध्ये मनोज जायस्वाल यांना अटक, सीबीआयची हॉटेलमध्ये कारवाई; 4000 कोटींची केस काय?
10
मोलकरणीने मालकिणीच्या 'थप्पड'चा असा घेतला बदला, वाचून तुमच्याही भुवया उंचावतील!
11
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
12
'शिंदे, पवार अन् भाजपचे ९०% आमदार मते चोरुन निवडून आले', संजय राऊतांचे टीकास्त्र
13
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
14
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
15
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
16
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
17
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
18
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
19
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
20
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा

Ashadhi Wari 2025 : पालख्यांच्या विसाव्यामुळे चौकांना मिळाली संतश्रेष्ठांची नावे

By राजू इनामदार | Updated: June 20, 2025 17:54 IST

- एकमेव महापालिका : लावणी गायिका म्हणत असे भजन आणि गवळण

पुणे : पालखी सोहळा हेही शहराचे गणेशोत्सवाप्रमाणेच अनोखे वैशिष्ट्य आहे. पुण्याने यातही आपले वेगळेपण जपले असून, राज्यातील या एकमेव शहरात संत ज्ञानेश्वर महाराज पादुका चौक व संत तुकाराम महाराज चौक आहेत. शहरात प्रवेश केल्यानंतर दोन्ही पालख्यांचा पहिला विसावा पूर्वी या ठिकाणी होत असे. तिथे तत्कालीन प्रख्यात लावणी गायिका मथूबाई इंदोरीकर यांचे भजन व गवळणींचे गायन झाल्यानंतरच पालख्या तिथून पुढे शहराकडे यायला प्रस्थान करत असत.

पालख्यांच्या पहिल्या विसाव्यावरूनच पुणेकर भाविकांनी या दोन्ही चौकांचे असे नामकरण केले. फर्ग्युसन रस्त्यावर पुढे-मागे असे हे दोन्ही चौक आहेत. आळंदीहून या रस्त्याने येणाऱ्या ज्ञानेश्वर महाराज व तुकाराम महाराज यांच्या पालख्या शहरात प्रवेश करत. ज्ञानेश्वर महाराज पालखीचा पहिला विसावा ज्या चौकात होत असे, तो झाला संत ज्ञानेश्वर महाराज पादुका चौक. त्यानंतर संत तुकाराम महाराज यांची पालखी शहरात प्रवेश करत असे. ती सर्वप्रथम ज्या ठिकाणी विसावा घेई, तो चौक झाला संत तुकाराम महाराज पादुका चौक. या चौकात पुणेकर भाविकांची पालख्यांच्या दर्शनासाठी प्रचंड गर्दी होत असे. विठ्ठलनामाच्या गजरात पालख्या शहरात प्रवेश करत या चौकांमध्ये पहिला विसावा घेत.

शेडगे पंचमंडळींची दिंडी क्रमांक ४ ही पालखी सोहळ्यातील महत्त्वाची दिंडी होती, ती पुण्यातलीच. शेडगे विठ्ठल मंदिर आजही प्रसिद्ध आहे. गणपतराव नलावडे, नारायणराव झांजले, मामासाहेब बडदे (यातील नलावडे पुढे महापौर झाले तर झांजले महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष व बडदे उपमहापौर) ही तत्कालीन नगरपालिकेची नगरसेवक मंडळी दिंडीचे प्रमुख शिलेदार होती. यातील बडदे दिंडीचे प्रमुख झाले. ही सगळी मंडळी पुण्याच्या तत्कालीन राजकारणातील महत्त्वाची मंडळी होती.

साधारणत: ५० ते ६० च्या दशकात पुण्यात मथूबाई इंदोरीकर म्हणून प्रसिद्ध लावणी गायिका होत्या. संत तुकारामांच्या भंडारा डोंगऱाखाली त्यांचे इंदोरी हे गाव. त्या शास्त्रीय संगीतामध्ये लावणी म्हणत. त्याही दर्शनासाठी येत. एकदा बडदे यांनी पालखीच्या एका विसाव्याजवळ या मथूबाई इंदोरीकर यांच्या गळ्यात टाळांची जोडी घातली. त्यांना काय करावे ते सुचेना. त्यांनी मग शास्त्रीय संगीतामध्ये भजन गाण्यास सुरुवात केली. त्यानंतर गवळण म्हटली. पुढे अनेक वर्षे मग ही प्रथाच पडून गेली. माजी आमदार उल्हास पवार यांनी ही माहिती दिली.

कालांतराने शहर वाढले. पूर्वी वेशीवर असणारे हे चौक शहरात कधी समाविष्ट झाले ते कळलेच नाही. भारत सावंत नगरसेवक असताना त्यांनी त्यांच्या परिसरात म्हणजे विश्रांतवाडी येथे व चंद्रकांत छाजेड यांनी दापोडी येथे पालख्यांचे स्वागत करण्यास सुरुवात केली. मात्र तरीही आज इतक्या वर्षांनंतरही शहरातील या दोन्ही चौकांचे महत्त्व कायम आहे. तिथे आता दोन मंदिरेही आहेत व वर्षभर तिथे नित्यनियमाने दिवाबत्ती होत असते, असे माजी महापौर अंकुश काकडे व स्थायी समितीचे माजी अध्यक्ष श्रीकांत शिरोळे यांनी सांगितले.

टॅग्स :ashadhi wariआषाढी एकादशी वारी 2025Maharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणेPandharpurपंढरपूरIndian Festivalsभारतीय उत्सव-सण