शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

Ashadhi Wari 2025 : माऊली मंदिरात रेलिंग तुटून दुर्घटनेची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 16:13 IST

माऊलींचा आषाढी पायी वारी प्रस्थान सोहळ्यात सहभागी होण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी अलंकापुरीत दाखल होत असतात.

- भानुदास पऱ्हाडआळंदी : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आषाढी पायीवारी पालखीचे गुरुवारी (दि. १९) रात्री पावणे अकराच्या सुमारास प्रस्थान झाले. दरवर्षी या प्रस्थान सोहळ्याला मानाच्या दिंड्यांमधील वारकऱ्यांना प्रवेश दिला जात असतो. मात्र या वारकऱ्यांव्यतिरिक्त प्रस्थान सोहळ्याला इतर वशिलेबाजांची संख्या जास्त असते. परिणामी देऊळवाड्याभोवती असलेल्या टेरेसवर प्रचंड गर्दी होते. टेरेसवर उभे राहिलेले 'हौसे' लोक रेलिंगवर भार देऊन प्रस्थान सोहळा पाहत असतात. सदरचा भार लोखंडी कठड्यांना सहन झाला नाही तर अचानक हे रेलिंग तुटून मोठी दुर्घटना होण्याची शक्यता निर्माण होत आहे. माऊलींचा आषाढी पायी वारी प्रस्थान सोहळ्यात सहभागी होण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी अलंकापुरीत दाखल होत असतात. आळंदीत आलेला प्रत्येक वारकऱ्याला माऊलींचा प्रस्थान सोहळा स्वतःच्या नयनांनी अनुभवायची इच्छा असते. मात्र देऊळवाड्यातील मर्यादित जागेमुळे तो प्रत्येकाला मंदिरात उपस्थित राहून पाहणे शक्य होत नाही. यावर मंदिर प्रशासनाने गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी नियमावली तयार केली आहे.प्रस्थान सोहळ्याच्या दिवशी मंदिरात 'श्रीं'च्या रथापुढील २० आणि रथामागील २७ यांसह अन्य काही उपदिंड्यांतील प्रत्येकी ९० वारकरी, मीडिया, मानकरी तसेच प्रस्थान संबंधित घटकांना (पासधारक) मंदिरात प्रवेश दिला जातो. गतवर्षी जिल्हा सत्र न्यायाधीश महेंद्र महाजन यांच्या अध्यक्षतेखाली दिंडी प्रमुख, फडकरी, मानकरी, चोपदार, महसूल विभाग, पोलीस प्रशासन व आळंदी देवस्थानचे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय घेतला होता. यंदाही हाच नियम कायम होता. प्रस्थान सोहळ्यापूर्वी पोलिसांकडून मंदिर रिकामे केले जाते. तरीसुद्धा अनेक 'वशिलेबाज' मंदिरात राहतात. सदरचे लोक हे धोकादायकपणे मंदिरासभोवतालच्या टेरेसवर उभे राहतात. प्रस्थान सोहळ्याच्या वेळी वारकरी देहभान विसरून नाचत असतात. अशातच एखाद्या वेळी रेलिंग तुटले तर टेरेसवरचे 'हौसे' वारकऱ्यांच्या अंगावर पडून दुर्घटना होऊ शकते. एकीकडे मंदिर प्रवेशासाठी स्थानिकांना वाद घालावा लागतो. मात्र दुसरीकडे 'वशिलेबाज' मोठ्या थाटात मंदिरात प्रवेश करत असल्याची सत्यस्थिती आहे. यावर वेळीच नियंत्रण आणणे गरजेचे असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडAshadhi Ekadashiआषाढी एकादशी २०२५ashadhi wariआषाढी एकादशी वारी 2025PandharpurपंढरपूरPandharpur Wariपंढरपूर वारी