शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Ashadhi Wari 2025 : श्री संत ज्ञानेश्वर माउली आणि श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा पुण्यात दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 20:57 IST

वारीचा आनंद सोहळा याचि देही, याचि डोळा अनुभवण्यासाठी पुणेकर वारी मार्गावर सकाळपासून आस लावून बसला होता.

पुणे : श्री संत ज्ञानेश्वर माउली आणि श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा शुक्रवारी दुपारी पुण्यात दाखल झाला. भक्तिरसात न्हालेल्या वारीने पुण्यनगरी हरिनामाने दुमदुमली. वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर पंढरपूर दर्शनाच्या उत्साहाची झलक तर त्यांचे दर्शन झाल्याचा आनंद पुणेकरांच्या चेहऱ्यावर झळकत होता. काही वारकरी टाळ-मृदंग वाजवत, फेर-फुगड्या खेळत, जयघोष करीत आनंदाने नाचत होते.

वारीचा आनंद सोहळा याचि देही, याचि डोळा अनुभवण्यासाठी पुणेकर वारी मार्गावर सकाळपासून आस लावून बसला होता. दुपारच्या वारी पुण्यनगरीत दाखल झाली आणि फुलांच्या वर्षावात सोहळ्याचे स्वागत करण्यात आले. प्रत्येक वारकरी समाधानी आणि आनंदी दिसत होता. कारण यंदा वरुणराजाने चांगलीच कृपा केली होती. 

भले काही ठिकाणी पेरण्या रखडलेल्या असल्या तरी पाऊस आल्याचा आनंद वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळाला. कित्येक वर्षांपासून वारी करणाऱ्यांशी ‘लोकमत’ने संवाद साधला. तेव्हा वारी ही वर्षभराच्या आनंदाची, उत्साहाची शिदोरीच असल्याचे अनेकांनी सांगितले. वारीचा आनंद निखळ, निरागस असतो. तो मिळवण्यासाठीच आम्ही या वारी सोहळ्यात दाखल होतो, अशा भावना वारकऱ्यांनी व्यक्त केल्या. लहान-थोर सर्वजण नटूनथटून वारीचे स्वागत करायला संचेती चौकात आले होते. वारीचा हा आनंद सोहळा आता पुण्यात मुक्कामी असणार आहे. त्यामुळे पुणेकर वारकऱ्यांची सेवा करण्यात दंग राहतील.

उद्या एक दिवस मुक्काम

पुण्यात संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालखी उद्या मुक्कामी असते. नागरिकांना पालखीचे दर्शन घेण्यासाठी पूर्ण एक दिवस मिळतो. रविवारी सकाळी माऊली सासवडच्या दिशेने तर संत तुकाराम लोणी काळभोरच्या दिशेने मार्गस्थ होणार आहेत.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPandharpur Wariपंढरपूर वारीAshadhi Ekadashiआषाढी एकादशी २०२५Pandharpurपंढरपूर