शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Ashadhi Wari 2025 : वारकऱ्यांमध्ये भक्ती ‘निरंतर’; पण वाहनांची सोय झाल्याने वारी झाली ‘हायटेक’

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 18:07 IST

पूर्वी बैलगाडीत वारकऱ्यांना जेवणासाठी लागणारे धान्य, कपडालत्ता घेऊन जावे लागायचे. आता प्रत्येक दिंडीत वाहनांची सोय झाल्यामुळे वारकऱ्यांची सोय हायटेक झाली आहे.

पुणे : डोक्यावर तुळशी वृंदावन, कपाळावर टिळा, हातामध्ये टाळ आणि मृदंग, मुखामध्ये हरिनामाचा गजर करत शेकडो वर्षांपासून वारी सुरू आहे. आता वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांमध्ये भक्ती आणि भाव तोच आहे; परंतु १९८५ वारकऱ्यांच्या दिंडीमध्ये टॅक्टर, ट्रक व इतर वाहने दाखल झाले. पूर्वी बैलगाडीत वारकऱ्यांना जेवणासाठी लागणारे धान्य, कपडालत्ता घेऊन जावे लागायचे. आता प्रत्येक दिंडीत वाहनांची सोय झाल्यामुळे वारकऱ्यांची सोय हायटेक झाली आहे.

महाराष्ट्र हा भक्ती आणि शक्ती गुणाने संपन्न, समृद्ध आहे. याला इतिहास आणि भूगोल साक्षीदार आहे. याच साक्षीने गेल्या शेकडो वर्षांपासून श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत जगद्गुरू तुकाराम महाराज यांची पालखी सोहळा देहू, आळंदीवरून पंढरपूरला जातात. वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांनी संख्या १९८० नंतर वाढत गेली आणि आजही ती वाढतच आहे; परंतु पूर्वी वारकऱ्यांना जेवणासाठी लागणाऱ्या धान्य, वस्तू ठेवण्यासाठी बैलगाड्यांचा सर्रास वापर होत होता.

कालांतराने तंत्रज्ञानाच्या युगात विविध वाहने उपलब्ध होऊ लागली. त्यामुळे वारीमध्ये टॅक्टर, ट्रक अशी वाहने मोठ्या प्रमाणात सामील झाली. वाहने उपलब्ध झाल्यामुळे वारकऱ्यांना लागणाऱ्या वस्तू ठेवण्यासाठी सोय झाली असून, गॅस सिलिंडरपासून चहा पावडरपर्यंत सर्व वस्तू सुरक्षित राहतात; परंतु पूर्वीच्या काळी जोरदार पाऊस आल्यावर बैलगाडीला बांधण्यात आलेल्या राहुट्यांतून पाणी यायचे. त्यामुळे सर्व वस्तू भिजून जायचे. यामुळे वारकऱ्यांचे हाल होत असे; परंतु वाहनांमुळे सोयीचे झाल्याने वारकऱ्यांना मोठा आधार मिळत आहे. 

रस्त्यावरील पाणी टँकर झाले गायब :वारकऱ्यांना पिण्याच्या पाण्याची सोयी व्हावी, यासाठी २००५ पर्यंत प्रत्येक एक किलोमीटर अंतरावर स्थानिक प्रशासनाकडून पाण्याचे टँकर उभे केले जात होते. त्याच ठिकाणी वारकरी अंघोळ करायचे आणि पुढे जायचे. आता प्रत्येक गावात शाळेमध्ये वारकऱ्यांसाठी राहण्याची, जेवणाची सोयी केली जाते. अंघोळीसाठी गरम पाण्यापासून जेवणासाठी सर्व सोय केली जाते. त्यामुळे पाण्याचे टँकर कमी होत गेले. अन् मळकट वारी गायब झाली :

पूर्वी वारीला जाताना वारकरी एकच धोतर आणि सदरा घेऊन जायचे. त्यामुळे दोन-तीन दिवस तोच धोतर आणि सदरा घालायचे; परंतु आता वाहनांमध्ये कपडे ठेवण्याची सोय झाल्याने प्रत्येक वारकरी किमान दहा ते पंधरा जोड धोतर आणि सदरा घेऊन जातात. शिवाय बारामती, इंदापूर आणि माळीनगर या ठिकाणी वारकऱ्यांच्या कपडे धुण्याची सोय स्थानिक नागरिकांकडून केली जाते. परिणामी कितीही पाऊस आला तरी दररोज कपडे बदलल्यामुळे मळकट, कळकट वारकरी दिसायचे बंद झाले.

वारी म्हणजे वारकऱ्यांच्या शिस्तीचा आणि विठ्ठलभक्तीच्या संगम आहे. मी गेल्या ३२ वर्षांपासून वारी करत आहे. पूर्वीच्या काळी वारकऱ्यांना सोयी नव्हत्या. त्यामुळे अनेक अडचणी येत होत्या; परंतु आता प्रत्येक मुक्कामी सोय आहे. शिवाय दिंड्यांमध्ये वाहने आहेत. त्यामुळे दैनंदिन लागणाऱ्या वस्तू सुरक्षित राहतात. वारीला लोकांची गर्दी वाढली तरी वारकऱ्यांमध्ये शिस्त, वागणे, बोलणे, मुखात हरिनाम, भाव आणि भक्ती तोच आहे. - सतीश गव्हाणे, वारकरी

टॅग्स :PuneपुणेPandharpur Wariपंढरपूर वारीAshadhi Ekadashiआषाढी एकादशी २०२५PandharpurपंढरपूरIndian Festivalsभारतीय उत्सव-सण