Ashadhi Wari 2025: पंढरीच्या वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष एक दिवसाचा अनुभव;पदाधिकारी कार्यकर्त्यांना सहभागी होण्याचे आवाहन

By राजू इनामदार | Updated: June 20, 2025 17:09 IST2025-06-20T17:08:50+5:302025-06-20T17:09:33+5:30

किमान एक दिवसाचा तरी वारीचा, वारकर्यांच्या भक्तीभावाचा, निष्ठेचा अनुभव घ्या या उद्देशाने सपकाळ यांनी या उपक्रमाचे आयोजन केले आहे.

Ashadhi Wari 2025 Congress state president's one-day experience in Pandhari's Wari | Ashadhi Wari 2025: पंढरीच्या वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष एक दिवसाचा अनुभव;पदाधिकारी कार्यकर्त्यांना सहभागी होण्याचे आवाहन

Ashadhi Wari 2025: पंढरीच्या वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष एक दिवसाचा अनुभव;पदाधिकारी कार्यकर्त्यांना सहभागी होण्याचे आवाहन

पुणे: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पंढरीच्या वारीत एक दिवसाचा सहभाग देणार आहेत. २४ डिसेंबरला (मंगळवार) सकाळी यवतपासून (पुणे सोलापूर रस्ता उरळी कांचनच्या पुढे) ते दिंडीत पायी चालतील. त्यादिवशी सायंकाळी वरवंड (ता. दौंड) येथे पोहचतील. दिंडी क्रमांक २८२ मधून ते चालणार आहेत.

किमान एक दिवसाचा तरी वारीचा, वारकर्यांच्या भक्तीभावाचा, निष्ठेचा अनुभव घ्या या उद्देशाने सपकाळ यांनी या उपक्रमाचे आयोजन केले आहे. काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांनाही त्यांनी यात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. दिंडीची शिस्त बिघडु नये यासाठी आधी नावनोंदणी आवश्यक केली आहे. 

ज्यांना सहभागी व्हायचे असेल त्यांनी त्वरीत प्रदेश कार्यालयाकडे आपली नोंदणी करून घ्यावी व मंगळवारी (दि.२४) सकाळी ७ वाजता यवत इथे २८२ क्रमाकांच्या दिंडीत यावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Ashadhi Wari 2025 Congress state president's one-day experience in Pandhari's Wari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.