शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
2
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
3
यूएईकडून भारताला धोका? ६००० कोटींच्या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार दुबईतून गायब; सुप्रीम कोर्ट संतापले
4
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
5
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
6
प्रणित मोरे आज परत येतोय? 'बिग बॉस १९' मध्ये मोठा ट्विस्ट; सोशल मीडियावर चर्चांना उधाण
7
लर्निंग लायसन्सचे ऑडिट कधी होणार? 'फेसलेस' प्रणालीमध्ये गंभीर त्रुटी उघड तरीही विभाग गप्प
8
अखेर सूरज चव्हाणने दाखवला होणाऱ्या बायकोचा चेहरा! अंकिता वालावलकरच्या घरी झालं केळवण, पाहा व्हिडीओ
9
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
10
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
11
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
12
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
13
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
14
“NCPचा तळागाळातील कार्यकर्ता निवडणुकीला सज्ज, आता पुढील ३ दिवसांत...”: सुनील तटकरे
15
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
16
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
17
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
18
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
19
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
20
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 

Ashadhi Wari 2025: माउलींच्या मानाच्या दोन्ही अश्वांचे आळंदीत आगमन;विधिवत पूजन करून मंदिर प्रदक्षिणा केली पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 20:16 IST

रथापुढे चालत असतो तो माउलीचा अश्व व दुसरा अश्व ज्यावर जरीपटका घेऊन अश्वस्वार झालेला असतो, तो स्वाराचा अश्व असे एकूण दोन अश्व या सोहळ्यात सहभागी आहेत.

-  भानुदास पऱ्हाडआळंदी : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आषाढी पायी वारी प्रस्थान सोहळ्यानिमित्ताने अंकली (ता. चिकोडी) येथून सुमारे ३०० कि.मी.चा प्रवास पूर्ण करत माउलींचे मानाचे दोन्ही अश्व आळंदीत दाखल झाले आहेत. आळंदीत दाखल झाल्यानंतर दोन्ही अश्वांचे विधिवत पूजन करण्यात करून मंदिर प्रदक्षिणा पूर्ण केली.

श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यासमोर दोन अश्व असतात. हे दोन्ही अश्व अंकली (ता. चिकोडी, कर्नाटक) येथून दरवर्षी येत असतात. यंदा ८ जूनला या दोन्ही अश्वांनी आळंदीकडे पायी प्रस्थान केले होते. सुमारे तीनशे कि.मी.चा पायी प्रवास अश्वांनी पूर्ण केला. माउलीच्या पालखी सोहळ्याचे आज (दि. १९) आळंदीतून पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा हैबतबाबांनी १८३२ साली सुरू केला. तेव्हापासून शितोळे सरकारांचे अश्व या सोहळ्यासाठी असतात. रथापुढे चालत असतो तो माउलीचा अश्व व दुसरा अश्व ज्यावर जरीपटका घेऊन अश्वस्वार झालेला असतो, तो स्वाराचा अश्व असे एकूण दोन अश्व या सोहळ्यात सहभागी आहेत.

माउलींच्या रिंगण सोहळ्यात हे दोन्ही अश्व वारकऱ्यांसाठी मुख्य आकर्षण असते. वारकरी या अश्वांच्या पायांखालील माती आपल्या मस्तकावर लावून स्वतःला धन्य करून घेत असतो. दरम्यान, आळंदीच्या वेशीवर अश्वांचे परंपरेप्रमाणे सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर (पवार) आणि आळंदी देवस्थानच्या वतीने पालखी सोहळा प्रमुख भावार्थ देखणे, प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ, विश्वस्त ॲड. राजेंद्र उमाप, विश्वस्त पुरुषोत्तम महाराज पाटील, विश्वस्त कबीरबुवा लोंढे, माउलींचे मानकरी आणि आळंदीकर ग्रामस्थांनी स्वागत केले. तद्नंतर माउलींच्या समाधीचे दर्शन घेऊन दोन्ही अश्व फूलवाले धर्मशाळा येथे मुक्कामी नेण्यात आले.

१८३२ सालापासून परंपरा कायम

हैबतबाबांनी १८३२ साली माउलींचा सोहळा स्वतंत्रपणे सुरू केला. तेव्हापासून शितोळे सरकारांनी या सोहळ्यास राजाश्रय दिला. त्यानुसार रोज शितोळे सरकारांच्या तंबूत माउलींच्या पादुकांचा मुक्काम, नैवेद्य, समाजआरतीस स्वतः किंवा प्रतिनिधींची उपस्थिती, वारीतील न्यायनिवाडा शितोळे सरकारांच्या ध्वजाखाली होणे हे रीतिरिवाज कायम आहेत. सोहळ्यात रोज पहाटे चार वाजता चोपदार अश्वास निमंत्रण देतात. त्यानंतर साडेपाच वाजता हा अश्व दर्शनासाठी माउलींच्या पादुकाजवळ येतो. त्यावेळी त्याच्या गळ्यात पुष्पहार घातला जातो. तेथून तो पुढे चालण्यास मार्गस्थ होतो. सोहळ्यात व इतर वेळी कधीही माउलीच्या अश्वावर कोणीही बसत नाही, अशी माहिती श्रीमंत सरदार ऊर्जितसिंह राजे शितोळे सरकार (अंकलीकर) यांनी दिली.

टॅग्स :ashadhi wariआषाढी एकादशी वारी 2025Pandharpur Wariपंढरपूर वारीAshadhi Ekadashiआषाढी एकादशी २०२५Indian Festivalsभारतीय उत्सव-सण