शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
Maharashtra Rain: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
3
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
4
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
5
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
6
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
7
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
8
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
9
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
10
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
11
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
12
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
13
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
14
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
15
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
16
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
17
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
18
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
19
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
20
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले

Heavy Rain: गणरायाला निरोप देताच पावसाचा धुमाकूळ; पुण्यात मुसळधार सुरु

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2022 17:31 IST

अचानक सुरु झालेल्या पावसाने शहरात नागरिकांची तारांबळ उडाली

पुणे : पुणे शहरात गणेश विसर्जनाला जोरदार पावसाशी शक्यता वर्तवण्यात आली होती. परंतु त्यादिवशी अजिबात पाऊस पडला नाही. त्यामुळे गणरायाला उत्साहात निरोप देता आला. पण विसर्जनानंतर दोन दिवसांनी पावसाने हजेरी लावली आहे. पुणे शहरासहित उपनगरातही मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. 

दरम्यान मागील दोन दिवस उकाड्याने नागरिक त्रस्त झाले होते. परंतु पाऊस पडला नाही. आज सकाळापासून आभाळ वातावरण दिसू लागले होते. दुपारनंतर ढगांमुळे सर्वत्र काळोख पसरला होता. त्यानंतर सायंकाळी पाचच्या दरम्यान पावसाला सुरुवात झाली. अचानक सुरु झालेल्या पावसाने शहरात नागरिकांची तारांबळ उडाली. दरम्यान गणेशोत्सवात संपूर्ण राज्यात पावसाचा जोर राहणार असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले होते. त्यावेळी दहा दिवसात संततधार पाऊस सुर होता. मात्र विसर्जन आणि त्यानंतरचा दुसरा दिवस पावसाने ब्रेक घेतला. आजपासून पुन्हा पावसाची धामधूम सुरू झाली आहे. 

मध्यवर्ती भाग आणि उपनगरात पाण्याचे लोंढे 

पुण्यात ढगांच्या गडगडाट आणि विजेच्या कडकडाटासहित पावसाला सुरुवात झाली आहे. अचानक जोरदार पावसाला सुरुवात झाल्याने मध्यवर्ती भागाबरोबरच उपनगरातही पाण्याचे लोंढे वाहताना दिसून आले. बऱ्याच ठिकाणी वाहतूककोंडीही झाली होती. रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहनांना अनेक अडथळ्यांना सामोरे जावे लागले.  

टॅग्स :PuneपुणेRainपाऊसWaterपाणीDamधरणTrafficवाहतूक कोंडी