शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

खेड शिवापूर येथे तब्बल ५५ लाखांचा गुटखा जप्त; राजगड पोलिसांची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2023 10:37 IST

कारवाईत शासनाकडून बंदी घालण्यात आलेल्या गुटखा, पान मसाला यांनी भरलेली काही पोती व बॉक्स आढळून आले

खेड-शिवापूर (वार्ताहर) : रविवारी पहाटे राजगड पोलिसांनी केलेल्या छापेमारीमध्ये श्रीराम नगर बांडेवाडी हद्दीतील व शिंदेवाडी हद्दीतील दोन गोडाऊनमध्ये सुमारे 55 लाख 62 हजार रुपयाचा गुटखा जप्त करण्यात आला. 

 मिळालेल्या माहितीनुसार राजगड पोलीस व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग पुणे यांच्या संयुक्त कारवाईमध्ये श्रीराम नगर हद्दीतील एका गोडावून मध्ये शासनाकडून बंदी घालण्यात आलेल्या गुटखा, पान मसाला यांनी भरलेली काही पोती व बॉक्स आढळून आले. त्याच बरोबर दुकानदारा कडे सखोल चौकशी केली. संबंधित दुकानदाराचे शिंदेवाडी तालुका भोर जिल्हा पुणे या गावचे हद्दीमध्येही एका पत्र्याच्या शेडमध्ये अशाच प्रकारचा माल लपवून ठेवण्यात आला असल्याचे माहिती समोर आली. त्या ठिकाणीही पोलिसांकडून छापेमारी करण्यात आली. या कारवाईमध्ये सुमारे 55 लाख 62 हजार 912 रुपये किमतीचा पान मसाला, गुटखा, सुगंधी मसाला,अश्या प्रकारचे बंदी असलेले  साहित्य असलेले बॉक्स आढळून आले. संबंधित मुद्देमाल पंचनामा करून तात्काळ जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी रमेश चौधरी सध्या (रा. श्रीरामनगर तालुका हवेली) याला अटक करण्यात आली आहे.    राजगडचे  पोलीस निरीक्षक सचिन पाटील, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ अधिकारी अविनाश शिळीमकर यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक मनोजकुमार नवसरे, पो. ह. संतोष तोडकर , राहुल कोल्हे, महादेव शेलार, सागर गायकवाड, अजित भुजबळ, यांच्या पथकाने ही कामगिरी केली या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज कुमार नवसारे हे करत आहेत.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीMONEYपैसा