शहरं
Join us  
Trending Stories
1
'हा' काय घोळ? पश्चिम बंगालच्या डॉक्टर कुटुंबाचे नाव थेट बांगलादेशच्या मतदार यादीत!
2
IND vs AUS 1st ODI : हिटमॅन रोहितनं मैदानात उतरत इतिहास रचला; पण हेजलवूडनं 'जोश' दाखवला अन्...
3
‘धन’त्रयोदशीला ग्राहकांचा २४ कॅरेट उत्साह; सोने ३ हजार, तर चांदी ७ हजार रुपयांनी स्वस्त
4
IND vs AUS 1st ODI : गिलच्या कॅप्टन्सीत या युवा क्रिकेटरला पहिली संधी; रोहितनं दिली वनडे डेब्यू कॅप
5
नाशिकजवळ धावत्या एक्स्प्रेसमधून तिघे फेकले गेले, दोघांचा मृत्यू; अपघातग्रस्त प्रवाशांची ओळख पटेना
6
क्रिकेटपटूंचा जीव घेतल्यानंतर पाकिस्तानचा अफगाणिस्तानसोबत युद्धविराम; या दोन देशांची मध्यस्थी...
7
आजचे राशीभविष्य १९ ऑक्टोबर २०२५ : ९ राशींसाठी आजचा दिवस फलदायी, धनलाभ होणारा...
8
३३ लाख शेतकऱ्यांच्या थेट खात्यात ३,२५८ कोटी; पॅकेज मदतनिधी मंजुरी, आतापर्यंत ७,५०० कोटींची मदत
9
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुबत्ता, नवीन नोकरीची संधी, शासकीय लाभ; दिवाळीत हाती पैसा!
10
‘कदम यांचे वय ११७ नव्हे ५४ वर्षे’ विरोधकांचे आरोप आयोगाने फेटाळले; आक्षेप-वस्तुस्थिती काय?
11
बिहार निवडणुकीत PM मोदींची तब्बल १२ सभांची तयारी; राहुल गांधींच्या एकाही सभेचे नियोजन नाही
12
महाआघाडी जागा वाटपाचा घोळ मिटेना; अर्ज भरण्याची मुदत संपली, चर्चेचे गुऱ्हाळ अद्याप सुरूच
13
बिहारमध्ये राजदचा पुन्हा ‘जंगलराज’ आणायचा प्रयत्न; अमित शाह यांची टीका, NDA विजयाचा विश्वास
14
‘ब्रह्मोस’ टप्प्यात पाकची इंच इंच भूमी; क्षेपणास्त्राच्या पहिल्या बॅचचे अनावरण, भारताचा इशारा
15
दोन लाखांवर मजुरांची दिवाळी अंधारातच! मनरेगाची १७० कोटी रक्कम चार महिन्यांपासून थकीत
16
बोगस मतदारांसाठी अधिकारीच पैसे घेतात; भाजपा आमदार मंदा म्हात्रेंचा गंभीर आरोप
17
शेतकरी कर्जमाफीची रक्कम ६ आठवड्यांत लाभार्थ्यांना द्या; औरंगाबाद खंडपीठाचे सरकारला निर्देश
18
महामुंबईत दिवाळी उत्सवावर पाणी? राज्यात कुठे सरी बरसणार, तर कुठे मोकळे आकाश
19
लाचखोर पाटोळेंसह तिघांना जामीन; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय; निलंबन युक्तिवाद ग्राह्य
20
कॉर्पोरेटच्या नादात महायुतीला महापुरुषांचा विसर; काँग्रेसची मेट्रो स्थानक नावांवरून टीका

माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2025 13:39 IST

आम्ही कुणीही खोटं बोलत नाही, तुम्ही वेगवगेळे वक्तव्य करून काही बोलू नको. हि ती वेळ नसून हा दहशतवाद पूर्णपणे बंद झाला पाहिजे. सगळ्यांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे

पुणे : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्यात गोळ्या लागून जखमी झालेले संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गनबोटे यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने शहरावर शोककळा पसरली आहे. पर्यटनासाठी फिरायला गेलेल्या कुटुंबाचा आनंद क्षणात हिरावला गेल्याने दोन्ही कुटुंबे अजूनही धक्क्यातच आहेत. त्यानंतर महाराष्ट्र सरकारने संतोष जगदाळे यांची मुलगी असावरी जगदाळे हिला सरकारी नोकरी देण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच महाराष्ट्रातील या सहा कुटुंबाना ५० लाखांची मदत जाहीर केली आहे. त्यानंतर आसावरी जगदाळे आणि त्यांच्या आई प्रगती यांच्याशी संवाद साधला. पहलगाम घटनेबाबत राजकारण करून आमच्या भावनांशी खेळू नका. अशी विनंती असावरी जगदाळेच्या आईने केली आहे.  

त्या म्हणाल्या, अजून आम्ही त्या धक्क्यातच आहोत, मला अजूनही व्यवस्थित झोप लागत नाही. लोक अजून आम्हाला भेटायला येत आहेत. आम्ही अजूनही त्या फायरींगच्या घटनेतच आहोत. असावरीला सरकारकडून आश्वासन मिळाली आहेत. म्हणून मी आनंदी आहे. पण आमचं खूप मोठं नुकसान झालं आहे. आमची सगळ्या राजकीय लोकांना एक विनंती आहे की, आमच्या भावनांशी खेळू नका. त्यांनी बोलून आम्हाला मारलंय, आम्ही सगळं खर सांगितलं आहे. आमच्या भावनांशी तुम्ही खेळू नका. त्याच राजकारण करू नका. त्यांनी गोळ्या झाडल्यावर मेंदू कसा बाहेर आला हे आम्ही बघितलं आहे. त्यामुळे माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका. त्यांनी माणुसकी म्हणून सर्वानी विचार केला पाहिजे. वक्तव्य करणं, बोलणं सोपं आहे. त्या घटनेत लहान मुलांनी जे सांगितलंय तेही खरं आहे. तुम्ही आमच्याशी वागू नका नका. आम्ही कुणीही काही खोटं बोलत नाही. तुम्ही वेगवगेळे वक्तव्य करून काही बोलू नको. हि ती वेळ नाही, हा दहशतवाद पूर्णपणे बंद झाला पाहिजे. सगळ्यांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे.

आम्हाला सेक्युरिटी द्या - असावरी जगदाळे 

आम्हाला या घटनेतून बाहेर पडण्यासाठी थोडा वेळ हवा आहे.  मोठे आवाज आले तरी आम्हाला भीती वाटत आहे. आम्हाला सरकारमार्फत सेक्युरिटी मिळाली तर बर होईल अशी मागणी असावरी यांनी केली आहे. माझ्यामुळे लोकांना मदत होईल अशा ठिकाणी मला जॉबमध्ये जागा मिळायला हवी. पुणे सोडून कुठेही जाता येणार नाही. पुण्यात जॉब असावा. राजकीय लोकांनी सारखं सारखं काही वक्तव्य करू नये, ते केल्याने हे झालय ते काही बदलणार नाही. किंवा या गोष्टीवर मार्ग निघणार नाहीत. आमचं भविष्य अंधारमय झालय. पैशांनी गोष्टी मिळतात. पण माणूस म्हणून आधार मिळत नाही. त्यांनी मानसिक आधार दिला आहे. मी सरकारचे खूप आभार मानते. 

टॅग्स :PuneपुणेPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाJammu Kashmirजम्मू-काश्मीरMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसEducationशिक्षणPoliticsराजकारण