शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

‘आरएसएस’च्या द्वेषाविरुद्ध प्रेमाचा लढा, अरुंधती रॉय यांचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2021 6:14 AM

Elgar Parishad : पेशवाई गेली, मात्र ब्राह्मण्यवाद गेला नाही. एकविसाव्या शतकात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ब्राह्मण्यवादाचे नेतृत्व करतो. मोदींच्या रूपात हे नेतृत्व दिल्लीच्या सत्तेवर बसले आहे.

पुणे : “जातीवाद, धर्माची सर्कस अजून संपलेली नाही. जातीधर्माच्या दहशतीखाली सत्ता गाजवली जात आहे. एका संकुचित विचारसरणीत अडकवून ठेवले जात आहे. याविरोधात एकजुटीने लढा उभारावा लागेल. ही अस्तित्वाची लढाई आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) विरुद्ध सत्यशोधक रेझिस्टन्स (एसएसआर) अर्थात द्वेष विरुद्ध प्रेमाची लढाई उभी करावी लागेल,” असे आवाहन आंतरराष्ट्रीय लेखिका अरुंधती रॉय यांनी शनिवारी केले. कोरेगाव भीमा शौर्यदिन प्रेरणा अभियानातर्फे आयोजित ‘एल्गार परिषदे’त त्या बोलत होत्या. माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील, माजी पोलीस अधिकारी एस. एम. मुश्रीफ आदी उपस्थित होते. ब्राह्मण्यवाद, भांडवलशाही व पितृसत्ताक व्यवस्थेच्या विरोधात ‘एल्गार’ करण्याची गरज रॉय यांनी अधोरेखित केली.रॉय म्हणाल्या, “पेशवाई गेली, मात्र ब्राह्मण्यवाद गेला नाही. एकविसाव्या शतकात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ब्राह्मण्यवादाचे नेतृत्व करतो. मोदींच्या रूपात हे नेतृत्व दिल्लीच्या सत्तेवर बसले आहे. मोदी काँग्रेसच्या वंशवादावर बोलताना दमत नाहीत; मात्र अंबानी, अदानी यांच्यासारख्या कॉर्पोरेट क्षेत्रातील घराणेशाहीला सढळ मदत करतात, हा विरोधाभास आहे. भांडवलशाहीमुळे देशात विषमता वाढीस लागली आहे. कोरोना काळात कोट्यवधी लोकांनी रोजगार गमावला, याच वेळी भारतातील श्रीमंतांची संपत्ती वाढत होती. कॉर्पोरेट वर्गाकडे सर्व सुविधा एकवटल्या आहेत.”अरुंधती रॉय म्हणाल्यादिल्लीतल्या शेतकरी आंदोलनाला माझा पूर्ण पाठिंबा आहे. कृषी विधेयके तातडीने मागे घेतली जावीत.आपल्याकडे राजकीय विचार, जात, धर्म यावर शिक्षा ठरवली जाते. भडकाऊ विधान करणारे लोक, टीव्ही अँकर खुलेआम फिरत आहेत आणि वकील, विचारवंत यांना तुरुंगात डांबले जात आहे. कोरेगाव भीमा प्रकरणी अटक केलेल्या सर्वांना त्वरित मुक्त केले जावे. ‘एल्गार’ म्हणजे युद्धाचे आव्हान“एल्गार म्हणजे युद्धाचे आव्हान. हे युद्ध विषमतावादी ब्राह्मण व्यवस्थेविरुद्धचे आहे. आजही आपण ब्राह्मणांच्या कचाट्यात आहोत. यातून बाहेर पडायचे असेल तर इंटेलिजन्स ब्युरो (आयबी) आणि मीडिया हातात घ्यायची गरज आहे,” असे मुश्रीफ म्हणाले. कोळसे पाटील यांनी सांगितले की, आपण मालक होऊ शकत नाही; कारण आपण संघटित नाही. ‘ते’ बरोबर नियोजन करतात आणि आपण भांडत बसतो. मनुवाद आणि ‘मनी’वादाला संपवले पाहिजे.

टॅग्स :Elgar morchaएल्गार मोर्चाPuneपुणे