पुणे जिल्हयात खतांचा कृत्रिम तुटवडा ?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2019 02:46 PM2019-08-30T14:46:23+5:302019-08-30T14:47:35+5:30

पीक चांगले यावे, यासाठी खतांची आवश्यकता आहे.

Artificial scarcity of fertilizers in Pune district? | पुणे जिल्हयात खतांचा कृत्रिम तुटवडा ?

पुणे जिल्हयात खतांचा कृत्रिम तुटवडा ?

Next
ठळक मुद्देचढ्या दराने होतेय विक्री : जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडे शेतकऱ्यांच्या तक्रारी

पुणे : जिल्ह्यात यावर्षी चांगला पाऊस झाला. यामुळे खरीप हंगामाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. सर्वत्र पेरण्या सुरू असून बहुतांश पेरण्या या उरकत आल्या आहेत. पिकांची वाढ चांगली व्हावी, यासाठी शेतकरी पिकांना खते देण्यासाठी खरेदी करत आहेत; मात्र या खतांचा कृत्रिम तुटवडा करून त्याची चढ्या दराने विक्री केल्याचा प्रकार पुढे आला आहे. याबाबतची तक्रार काही शेतकऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या शेतकऱ्यांकडे केली आहे. 
जिल्ह्यात खरीप हंगाम सुरू आहे. बहुतांश ठिकाणी पेरण्यांची कामे पूर्ण झाली आहेत. पीक चांगले यावे, यासाठी खतांची आवश्यकता आहे. जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने यावर्षी खतांचा तुटवडा पडू नये यासाठी मोठ्या प्रमाणात खतांची उपलब्धता करून दिली होती; मात्र या खताची कृत्रिम टंचाई करून त्याची चढ्या दराने विक्री करून शेतकऱ्यां ची लूट सुरू आहे.  याबाबत पुरंदर तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी याबाबत जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडे तक्रार केली आहे़  पुरंदर तालुक्यातील बहुतांश खत विक्रेत्यांकडे खते उपलब्ध नाहीत, असे भासविले जात आहे़  याबाबत पंचायत समितीच्या कृषी अधिकाºयांकडे तक्रार केली असता ते देखील दखल घेत नाहीत, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे़  
या कृषी अधिकाऱ्यांच्या तक्रारी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातील काही अधिकाºयांकडे केल्यास ते संबंधित कृषी अधिकाऱ्याला आमची नावे सांगतात़  एकंदरीतच खतांचा कृत्रिम तुटवडा हा पुरंदर तालुक्यातील काही विक्रेते आणि तेथील अधिकाऱ्यांच्या संगनमताने सुरू असल्याचेही शेतकऱ्यांनी तक्रारीदरम्यान सांगितले़  
.......
जे कोणी विक्रेते शेतकऱ्यांची लूट करत असतील अथवा त्यांना चढ्या दराने खतांची विक्री करत असतील, तर याबाबत माहिती घेऊन तत्काळ कारवाई करण्यात येणार आहे़ तसेच याबाबत अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात येईल़ त्यामुळे शेतकºयांनी चढ्या दराने विक्री करणाऱ्यांची तक्रार करावी़- अनिल देशमुख, कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे
..........
युरियाची बाजारातील किंमत ही २६५ रुपये असतानाही ३२० रुपयांना त्याची विक्री केली जात असून, शेतकºयांची लूट केली जात आहे़  याबाबत जिल्हा परिषद काय कार्यवाही करणार, याकडे लक्ष लागून राहिले आहे़  पुरंदर तालुक्याप्रमाणेच जिल्ह्यातील इतर काही तालुक्यांमध्येही असाच प्रकार सुरू आहे़
४पेरणी केल्यावर शेतकऱ्यांना खतांची कमतरता पडू नये, यासाठी यावर्षी युरिया, डीएपी, एमओपी आणि एसएसपी खते जिल्हापरिषदेतर्फे उपलब्ध खरीपासाठी करून दिली जाण्याची घोषणा केली होती. जवळपास १ लाख ७० हजार ६७० टन खते शेतकºयांना दिली जाणार होती.

Web Title: Artificial scarcity of fertilizers in Pune district?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.