शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

बालपणातील कलेचा भविष्यात फायदा होतो 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2019 1:18 PM

लहानपणापासून अभिनय क्षेत्रात काम करणाºया कलाकारांचे मत

अतुल चिंचली-पुणे : प्रत्येकामध्ये जन्मापासूनच एखादी कला असते. आयुष्यात कलेला खूपच महत्त्व आहे. मुलांचा कला, अभिनय, नाट्य क्षेत्रात कल असेल, तर पालकांची जबाबदारी आहे, की मुलांना लहानपणीच कला जोपासण्यास प्रोत्साहन द्यावे. जेणेकरून बालवयात मनापासून आत्मसात केलेल्या कलेचा भविष्यकाळात नक्कीच फायदा होतो, असा सकारात्मक संदेश लहानपणापासून अभिनय क्षेत्रात असणाºया कलाकारांनी दिला आहे. देशाचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिन बाल दिन म्हणून साजरा केला जातो. हे औचित्य साधून ‘लोकमत’ने तरुण कलाकारांशी संवाद साधला...........मी वयाच्या तिसºया वर्षापासून वक्तृत्व, कथाकथन, भाषणे अशा स्पर्धांमध्ये भाग घेत होतो. दुसरीत नाटकात व चौथीत असताना ‘युवराज’ या हिंदी चित्रपटात काम केले. बालकलाकार म्हणून काम करताना वाईट सवयी लागणे, अज्ञात व्यक्तींच्या संपर्कात आल्याने नुकसान होणे, यशाची चव चाखल्याने डोक्यात प्रसिद्धीची हवा जाणे अशा काही नकारात्मक गोष्टी जाणवल्या; पण प्रत्येक प्रोजेक्टवर सकारात्मक विचारानेच काम केले. ‘युवराज, बोक्या सात बंडे, हॉस्टेल डेज, सुरसपाटा’ अशा मराठी चित्रपटांत काम केले आहे. लहान मुलांना कलेची आवड असते. त्यापासून त्यांना थांबवू नका. लहान वयात कुठलाही तणाव नसतो. त्यामुळे ते कलेसाठी बुद्धीचा वापर करू शकतात. मी आता कलर्स मराठीवरील ‘स्वामिनी’ या मालिकेत माधवराव यांची भूमिका करत आहे.        - चिन्मय पटवर्धन, कलाकार.......मी बालनाट्यापासून अभिनयाला सुरुवात केली. तेव्हा काही कळत नव्हते. लहान असताना लोकांच्या नकला, हिरोंप्रमाणे अभिनय करत होतो. बालपणातच चित्रपटात काम करण्याची संधी मिळाल्याने टेक्निकल गोष्टी कळत गेल्या. लहान असताना चेहरा निरागस असतो. त्यामुळे चेहºयावर हावभाव दिसून येतात; पण वय वाढत जाईल तसे हावभाव आणावे लागतात. जन्मापासूनच असणाºया कलेकडे छंद म्हणूनच पाहावे, त्याचा करिअर म्हणून भविष्यात उपयोग होऊ शकतो. मी स्टार प्रवाहावरील ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर महामानवाची गौरवगाथा’मध्ये डॉ.बाबासाहेबांच्या मेहुण्याची भूमिका करीत आहे.- चिन्मय संत, कलाकार  .....माझी पुण्यातील बालनाट्यातून सुरुवात झाली. ‘हरिश्चंद्राची फॅक्ट्री, बालगंधर्व, बोक्या सातबंडे, रानभूल’ अशा चित्रपटांत काम केले आहे. माझे बाजीराव रस्त्यावरील नूतन मराठी विद्यालय शाळेत शिक्षण झाले. कुटुंबात पूर्वीपासून नाटकाचा वारसा होता; त्यामुळे शाळेत होणाºया आॅडिशनमध्ये कधीही अडथळे आले नाहीत. अभिनयाची एवढी आवड असूनही अभ्यासाकडे कधीही दुर्लक्ष केले नाही. अभिनय क्षेत्र खूप मोठे आहे. मुलांनी हिरो होण्यासाठी अभिनय क्षेत्रात जाऊ नये. अभिनयाव्यतिरिक्त चित्रकला, हस्तकला अशा कलांनाही प्राधान्य द्यावे. बालपणात मुलांनी आपली कला छंद म्हणून जोपासण्यास सुरुवात केली, की करिअरच्या दृष्टीनेही फायदा होतो. सध्या स्टार प्रवाहवरील ‘विठू माऊली’ मालिकेत पुंडलीकाची भूमिका करीत आहे. - अथर्व कर्वे, कलाकार .........

टॅग्स :Puneपुणेchildren's dayबालदिनTheatreनाटकcinemaसिनेमाVithu Mauli Serialविठुमाऊली