शहरं
Join us  
Trending Stories
1
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
2
चीन अन् पाकसह भारतीय सैन्यही बेलारूसला पोहचले; रशियाच्या खेळीनं NATO देशांची धडधड वाढली, कारण...
3
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' दिवशी ९० मिनिटांसाठी बंद राहणार UPI सेवा, जाणून घ्या
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
5
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! "तो जिवंत आहे की मेला?", राजा रघुवंशीचा काटा काढल्यावर पत्नीने विचारलेला प्रश्न
6
समृद्धी महामार्गावर खिळे ठोकून दुरुस्ती की घातपाताचा प्रयत्न? अनेक वाहने पंक्चर, प्रवासी संतप्त
7
पितृपक्ष 2025: श्राद्धाचा नैवेद्य ठेवताना डावीकडून उजवीकडे पाणी फिरवतात; का ते माहितीय का?
8
नवी मुंबईतील 'त्या' बांधकामांना 'ओसी' देऊ नये; विधान परिषद सभापतींचे आदेश
9
Panvel: जेवताना चिकन कमी वाढले, पत्नीला जाळून मारले; फरार आरोपीला हैदराबादमध्ये अटक
10
नोकरी गेल्यानंतर पीएफमधील पैशांवर व्याज मिळते? काय आहे ईपीएफओचे नियम?
11
भारताच्या वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने दिली 'गुड न्यूज'; पत्नीच्या मॅटर्निटी फोटोशूटची चर्चा
12
फेसबुकचे मालक मार्क झुकरबर्ग यांची जबरदस्त ऑफर! फक्त हे काम करून दर तासाला ५ हजार रुपये मिळवा
13
तमाशातील नर्तकीवर प्रेम, पण ती टाळायला लागल्याने माजी उपसरपंच झाला वेडापिसा, त्यानंतर तिच्या घरासमोरच उचललं टोकाचं पाऊल
14
वर्क फ्रॉम होम कल्चर संपतंय का? 'या' दिग्गज टेक कंपनीनंही आपल्या कर्मचाऱ्यांना ऑफिसला बोलावलं
15
आयफोन १७ सिरीजमध्ये 'या' गोष्टी मिळणार नाहीत; खरेदी करत असाल तर...
16
रशिया-युक्रेन युद्धात 'या' देशानं मारली उडी; रशियन ड्रोन्स पाडले, F 16 लढाऊ विमाने हवेत झेपावली
17
धनत्रयोदशी-दिवाळीपर्यंत कुठवर पोहोचणार सोन्याचा दर? आता आहे ₹१.१२ लाखांच्या पार, खरेदीपूर्वी पाहाच
18
'ही' छोटी कार आता ३ लाख रुपयांपर्यंत स्वस्त; जीएसटी कपातीमुळे नवीन किंमती जाहीर
19
नेपाळमध्ये लष्कराने सूत्रं हातात घेतली, एअर इंडिया-इंडिगोची विमान उड्डाणे रद्द
20
महाराष्ट्रात ७०० आरटीओ अधिकाऱ्यांची कमतरता, प्रशासनावर ताण

हजारो किलोमीटरचा प्रवास करून उजनी जलाशयावर 'फ्लेमिंगो'चे आगमन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2023 12:46 IST

या गुलाबी पंखांना उजनी जलाशयाची मोठी आस आहे....

- सतीश सांगळे

कळस (पुणे) : परदेशातील दूरच्या भागातून हजारो किलोमीटरचा प्रवास करून उजनी जलाशय परिसरातील पाणलोट क्षेत्रात स्थलांतर करून रोहित (फ्लेमिंगो) पक्षी दाखल झाले आहेत. या गुलाबी पंखांना उजनी जलाशयाची मोठी आस आहे.

इंदापूर तालुक्यातील उजनी जलाशय ‘रोहित’ (फ्लेमिंगो) पक्ष्यांचे वास्तव्याचे प्रमुख ठिकाण आहे. विस्तीर्ण जलाशय, खाद्यान्नाची मुबलकता, पाणथळ जागा अशा वास्तव्य उपयोगी गोष्टी असल्याने पक्षी आपल्या ‘वसाहती’ थाटतात. मध्य आशिया तसेच ऑस्ट्रेलिया, आफ्रिका, केनियातील सरोवरांमध्ये त्यांना लागणाऱ्या अन्नाची कमतरता निर्माण झाल्यानंतर फ्लेमिंगो मोठ्या संख्येने स्थलांतर करतात. साधारणत: प्रतिवर्षी नोव्हेंबर ते मार्चदरम्यान प्लेमिंगो भारतामध्ये येऊन निरनिराळ्य़ा ठिकाणी वास्तव्य करतात. उजनी फुगवट्यावर क्रौंच, रोहित, बदके, पानकोंबडी, चित्रबलाक, चांदवा, चमच्या, जांबळी, तलवार, राखीबगळा वेडर्ससह शेकडो विविध प्रकारच्या ३०० प्रकारच्या पक्ष्यांचे वास्तव्य आहे. अनेक स्थलांतरित पक्षी येथे मुक्कामी येत आहेत. विणीचा हंगाम असल्यामुळे पाणथळ व सुरक्षित ठिकाणी अनेक पक्षी पिलांना जन्म देतात .

उजनी धरणावर येऊन पक्ष्यांना पाहणे हा एक वेगळाच अनुभव असतो. इंदापूर तालुक्यातील कुंभारगाव, डिकसळ जुना पूल, पळसदेव या परिसरात हमखास फ्लेमिंगो पाहायला मिळतात. उजनी जलाशय परिसरात विशेषत: डिकसळ, कुंभारगाव या पट्ट्यातही प्लेमिंगो पक्ष्यांचे थवे दिसून येतात. जलाशयातील पाणी कमी झाल्यानंतर निर्माण होत असलेल्या दलदलीत त्यांचे विशिष्ट असे खास खाद्य निर्माण होत असते. यामध्ये शेवाळ, पानवनस्पती, किडे हे खाद्य खऱ्या अर्थाने ही एक प्रकारची मेजवानीच असते.

रोहित पक्ष्याची चोच ही अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असते. चोचीच्या आकारामुळे या पक्ष्याला चिखलामधील खाणे शोधणे अतिशय सोपे जाते. तसेच याच चोचीने ते चिखलाचे घरटेदेखील बनवतात. पाण्यामध्ये पांढऱ्या आणि गुलाबी छटा असलेल्या या पक्ष्यांचा थवा, लांबलचक गुलाबी पाय, पांढऱ्याशुभ्र पंखाच्या खाली भडक काळी-गुलाबी छटा, उंच मान आणि अणकुचीदार चोच यामुळे हे पक्षी देखणे दिसतात. सूर्योदयापूर्वी या पक्ष्यांचे थवे तलावावर दाखल होतात आणि खाद्य शोधण्याची लगबग सुरू होते. एकमेकांना मानेने ढुशा देत, चिखलात चोच रुतवून ते खाद्य मिळवतात. यावेळी क्व्रा...,क्व्रा.. अशा आवाजाचा गलका करत भक्ष्य पकडणाऱ्या प्लेमिंगोचे दृश्य पाहण्याजोगे असते. ऊन पडल्यानंतर ते पाण्यातच आराम करतात. ते आपली उंच मान दुमडून पंखांच्या खाली खोचतात. दिवसभर मौज-मस्तीनंतर सूर्यास्तावेळी पुन्हा पक्षी हवेत झेपावतात. एका मागोमाग एक असा शिस्तबद्ध उडणाऱ्या या पक्ष्यांचा हा थवा थक्क करणारा असतो. देशातील अनेक पक्षितज्ज्ञांनी या परिसराला भेट देऊन पक्ष्यांची पाहणी केली आहे.

उजनीचा पट्टा इंदापूर तालुक्यास पाणी व स्थलांतरित पक्ष्यांमुळे वरदान ठरला आहे. गेली तीन दशके हे पक्षी येथे येत आहेत. त्यामुळे या भागात पर्यटनाला मोठी संधी आहे. पक्षी निरीक्षण केंद्र, वनस्पती अभ्यास केंद्र आणि प्राणिसंग्रहालय उभारून पर्यटकांना इकडे आकर्षित करता येऊ शकते. तसेच जलपर्यटन आणि कृषी पर्यटन या दृष्टीनेही महत्त्व आहे.

टॅग्स :PuneपुणेUjine Damउजनी धरणDamधरणbirds sanctuaryपक्षी अभयारण्य