शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

गौरी आगमनामुळे पालेभाज्यांच्या किमती कडाडल्या; मेथी,शेपू, कोथिंबीरला प्रचंड मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2020 12:32 IST

मंगळवारी सर्वच पालेभाज्यांचे दर चांगलेच कडाडले, गड्डीला ४० रुपये भाव..  

ठळक मुद्देदरवर्षीच गौरीचे आगमन झाल्यानंतर भाज्यांच्या मागणीत होते वाढ; यंदा दर तेजीत

पुणे : गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यासह राज्यात सर्वत्र जोरदार पाऊस सुरू आहे. यामुळे पालेभाज्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यात गौरी आगमनामुळे पालेभाज्यांच्या मागणीत मोठी वाढ झाली असून, मंगळवारी सर्वच पालेभाज्यांचे दर चांगलेच कडाडले. यामध्ये मेथी, शेपू आणि कोथिंबीरला अधिक मागणी असल्याने एका गड्डीला तब्बल ४० रुपये दर मिळाला. पावसाचा फार मोठा फटका शेती मालाला बसला आहे. मागणी अधिक आणि आवक कमी अशी स्थिती बाजारात निर्माण झाली आहे. त्याचाच परिणाम म्हणून पालेभाज्यांचे दर तेजीत आहेत. किरकोळ बाजारात मेथी, कोथिंबीरीच्या गड्डीचा दर ४० रूपयांवर पोहोचला आहे. मंगळवारी गौरीचे आगमन झाले. बुधवारी (दि.२६) रोजी गौरी आवाहन आहे. त्यानिमित्ताने गौरीला पालेभाज्यांचा नैवैद्य केला जातो. मेथी, शेपू, कोथिंबिर या पालेभाज्यांना ग्राहकांकडून मागणी आहे. दरवर्षीच गौरीचे आगमन झाल्यानंतर भाज्यांच्या मागणीत वाढ होते. यंदा मागणी आहे. मात्र पावसामुळे आवक कमी होत असल्याने दर तेजीत आहेत. आणखी दोन दिवस पालेभाज्यांचे दर तेजीत राहणार असल्याची माहिती व्यापा-यांनी दिली. दरम्यान पालेभाज्यांसह पडवळ, घोसावळे आणि आळूच्या पानांना मागणी वाढली आहे. किरकोळ बाजारात घोसावळ्याच्या एका किलोचे दर १०० ते १२० रुपये दर मिळाला. आळूच्या पानांना १० ते १५ रुपये दर मिळाला. पावसामुळे पालेभाज्या भिजल्या आहेत. त्यामुळे चांगल्या प्रतीच्या पालेभाज्यांचे दर तेजीत आहेत. 

टॅग्स :PuneपुणेGanesh Mahotsavगणेशोत्सवvegetableभाज्याRainपाऊसcorona virusकोरोना वायरस बातम्या