पिंपरी-चिंचवड: बेकायदेशीररित्या तंबाखू, विदेशी सिगारेट विक्री करणाऱ्यास अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2021 06:19 PM2021-11-12T18:19:02+5:302021-11-12T18:21:27+5:30

पिंपरी: प्रतिबंधित तंबाखू विदेशी सिगारेट बेकायदेशीर विक्री प्रकरणी गुन्हे शाखा युनिट चारच्या पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे. कारवाईत ...

Arrested for selling tobacco, foreign cigarettes illegally | पिंपरी-चिंचवड: बेकायदेशीररित्या तंबाखू, विदेशी सिगारेट विक्री करणाऱ्यास अटक

पिंपरी-चिंचवड: बेकायदेशीररित्या तंबाखू, विदेशी सिगारेट विक्री करणाऱ्यास अटक

googlenewsNext

पिंपरी: प्रतिबंधित तंबाखू विदेशी सिगारेट बेकायदेशीर विक्री प्रकरणी गुन्हे शाखा युनिट चारच्या पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे. कारवाईत प्रतिबंधित विदेशी सिगारेट आणि तंबाखू १४ हजारांचा साठा जप्त करण्यात आला आहे. सुसगाव ग्रामपंचायत कार्यालयाजवळ गुरुवारी ही कारवाई करण्यात आली. नंदकिशोर पुशाराम शर्मा (वय ४४, रा. सुसगाव, ता. मुळशी) असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस नाईक सुरेश जायभाये यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंजवडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना गुन्हे शाखा युनिट चारच्या पोलिसांना माहिती मिळाली की, सुसगाव ग्रामपंचायतजवळ एकजण टेम्पो घेऊन आला असून तो प्रतिबंधित तंबाखू आणि विदेशी सिगारेट विकत आहे. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून १४ हजार २५ हजारांची तंबाखू आणि विदेशी सिगारेट जप्त केले. तसेच साडेतीन लाखांचा एक टेम्पो देखील पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.

Web Title: Arrested for selling tobacco, foreign cigarettes illegally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.