शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
2
वादावर पडदा? सॅम पित्रोदांनी दिला IOC अध्यक्षपदाचा राजीनामा, पक्षानेही तात्काळ स्वीकारला
3
"विचित्र बडबड करणं सॅम पित्रोदांचा स्वभाव, त्यांनी भारताचा अपमान केलाय"; रामदास आठवलेंची शाब्दिक चपराक
4
CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड
5
"कुमारस्वामी हे ब्लॅकमेलिंगचे बादशहा अन् रेवन्ना कहाणीचे दिग्दर्शक-निर्माते", डीके शिवकुमार यांचा आरोप
6
"ते स्वतःच माणसासारखे कमी अन् पक्ष्यासारखे जास्त दिसतात..."; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर कंगना भडकली 
7
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
8
अरविंद केजरीवाल यांना जामीन मिळणार की नाही? सर्वोच्च न्यायालय शुक्रवारी देणार निकाल 
9
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
10
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
11
भारताचा नवा विक्रम; परदेशात राहणाऱ्या भारतीयांनी वर्षभरात मायदेशी पाठवले 111 अब्ज डॉलर्स
12
चीनचं टेन्शन वाढणार! ज्या बाजारावर होता दबदबा, आता त्यावर भारत राज्य करणार
13
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
14
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
15
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
16
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
17
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
18
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...
19
“सत्तेत आल्यावर अयोध्येतील राम मंदिराचे शं‍कराचार्यांच्या हातून शुद्धीकरण करु”: नाना पटोले
20
इस्रायलने कुणालाही न जुमानता राफा शहरावर हल्ला केला, अमेरिकेने बरोबर इंगा दाखवला, दिला मोठा दणका

दोन मुलींवर बलात्कार करणाऱ्या आरोपीस अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2018 3:24 AM

अंधश्रद्धेच्या नावाखाली दाखवीत होता भीती, आरोपींमध्ये महिलेचा समावेश

मुंढवा : कॉलेजचा अभ्यास अवघड जात असल्याने मुलगी कॉलेजला सतत गैरहजर राहत होती. या कारणास्तव त्या मुलीला कॉलेजच्या परीक्षेला बसता आले नाही. या गोष्टीमुळे मुलीची आई बेचैन झाली. आपल्यावर काही तरी संकट कोसळले अथवा मुलीला काहीतरी बाधा झाली आहे, या समजुतीने कोंढव्यातील एका दैवी शक्तीवाल्या महिलेकडे घेऊन गेली. या दैवी शक्तीवाल्या महिलेने दैवी शक्तीची भीती दाखवून या पीडित मुलीला व तिच्या अल्पवयीन मैत्रिणीला ‘संकट टाळते’ या बहाण्याने घरी बोलावून मानसिक छळास सुरुवात केली.त्यानंतर कोंढव्यातील एका मंडप व्यावसायिकाच्या घरी या मुलींना नेऊन त्या मंडप व्यावसायिकाने स्वत: व त्याच्याकडे कामास असलेल्या मुलाने दुसºया अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी मुंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून फरीन फारूक शेख (रा. कोंढवा), पुणे व शफीक रफिक शेख (वय २८, रा. कोंढवा) यांना अटक करण्यात आली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये राहणारी मुलगी ही कॉलेजमध्ये एफ.वाय. बी.कॉम.चे शिक्षण घेत असताना तिला इंग्रजी माध्यम अवघड जात असल्याने ती कॉलेजमध्ये गैरहजर राहत होती. त्यामुळे तिला परीक्षेस बसता आले नाही. त्यामुळे मुलीच्या आईने आपल्यावर काहीतरी संकट आले आहे, असे समजून इतरांच्या सांगण्यावर फरीन फारूक शेख (रा. कोंढवा, पुणे) हिच्या अंगात येते व दैवशक्ती आहे. ती संकटांवर उपाय सांगते, या भावनेने या पीडित मुलीची आई तिला घेऊन शेख हिच्याकडे कोंढवा येथे गेली. आरोपी फरीन हिने पीडित मुलीला ‘तुझ्या अंगात हजरत येईल व तुझे पेपर हजरत लिहील,’ असे सांगून आईला पटविले. ‘तुमच्या मुलीला माझ्याकडे पाठवा,’ असे सांगितले. त्यानंतर पीडित मुलगी व तिची अल्पवयीन मैत्रीण आरोपी फरीन हिच्या घरी गेल्या असता, हातपाय दाबायला सांगितले. न दाबल्यास ती मारहाण करीत असे. असे अमानुष प्रकार सुरू होते. सामाजिक सुरक्षा विभाग, गुन्हे शाखा यांच्याकडे तक्रार अर्ज केल्याने परिमंडळ ५ चे पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड यांनी संबंधित आरोपींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.त्यानंतर पीडित मुलीने ११ डिसेंबर रोजी मुंढवा पोलीस ठाण्यात महिला पोलीस हवालदार भारती होले व सहायक पोलीस निरीक्षक संभाजी गोलांडे यांच्याकडे तक्रार दिली. त्यानंतर या आरोपींवर बलात्कार व पोस्को, महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबतचा अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला. मुंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पात्रुडकर पुढील तपास करीत आहेत.हा प्रकार आईला सांगितल्यास त्या पीडित मुलीला ‘तुझे मानलेल्या भावावर प्रेमसंबंध चालू आहेत असे तुझ्या आईलाच सांगेन,’ असे धमकावले. या गोष्टीमुळे पीडित मुलगी घाबरली. त्याचाच फायदा घेऊन आरोपी फरिन हिने कोंढवा येथील मंडप व्यावसायिक शफीक रफिक शेख याच्या घरी या मुलांनी नेऊन शरिफ शेख याने त्या पीडित मुलीवर व कामास असलेल्या मुलाने दुसºया अल्पवयीन मुलीवर धमाकावून वारंवार बलात्कार केला. हा प्रकार सन २०१६पासून होत होता. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सदस्याच्या मदतीने तक्रार दाखल केली.

टॅग्स :Rapeबलात्कारArrestअटक