घरात घुसून चटके देत बलात्कार करणाऱ्या नराधमाला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2018 17:02 IST2018-08-08T16:55:52+5:302018-08-08T17:02:01+5:30
अल्पवयीन मुलगी एकटी असताना घरात घुसून पायावर चटके देऊन तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणात रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी तरुणाला अटक केली.

घरात घुसून चटके देत बलात्कार करणाऱ्या नराधमाला अटक
पुणे : अल्पवयीन मुलगी एकटी असताना घरात घुसून पायावर चटके देऊन तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणात रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी तरुणाला अटक केली.
किरण प्रकाश पवार (वय २४, रा. अजनुज, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर) असे त्याचे नाव आहे. या प्रकरणी १६ वर्षाच्या पिडीत मुलीने रांजणगाव पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. ही घटना २१ जून रोजी दुपारी शिरूर तालुक्यातील कारेगाव येथे घडली. ही मुलगी घरात एकटी असताना किरण त्याने तिच्या घरात प्रवेश केला. माचिसच्या काडीने दोन्ही पायांना चटके दिले. त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला. मोबाईलमध्ये तिचे अश्लील फोटो काढले. घडलेल्या घटनेबाबत कोणाला सांगितल्यास तिला, तिच्या आई-वडिलांना जीवे मारण्याची धमकी त्याने दिली. या प्रकरणात पोलिसांनी किरण याला अटक करून विशेष न्यायालयात हजर केले. त्यावेळी त्याची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी आणि अश्लील फोटो काढलेला मोबाईल जप्त करण्यासाठी त्याला पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकिलांनी केली. त्यानुसार न्यायालयाने त्याला १० आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.