शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

भूत काढण्याच्या नावाखाली तरुणीशी लग्न लावणाऱ्या भोंदूबाबाला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2018 23:10 IST

उच्च शिक्षित तरुणीशी लग्न करण्यासाठी भूतबाधा घालविण्याचा बनाव रचून मुलीकडे शरीरसुखाची मागणी करून विनयभंग करणा-या भोंदूबाबाला खडक पोलिसांनी अटक केली आहे. 

पुणे : उच्च शिक्षित तरुणीशी लग्न करण्यासाठी भूतबाधा घालविण्याचा बनाव रचून मुलीकडे शरीरसुखाची मागणी करून विनयभंग करणा-या भोंदूबाबाला खडक पोलिसांनी अटक केली आहे. हा खळबळजनक प्रकार घोरपडे पेठ भागात घडला आहे.राजू अप्पा साळवे (वय ४२, रा. घोरपडे पेठ) असे या भोंदूबाबाचे नाव आहे. त्याविरुद्ध विनयभंग करणे, महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादुटोणा कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला राहत्या घरातून अटक करण्यात आली.याप्रकरणी एका २३ वर्षाच्या तरुणीने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार ५ ते २२ मार्च दरम्यान घडला आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले की, राजू साळवे हा या तरुणीच्या भावाचा मित्र म्हणून त्यांच्या घरी यापूर्वी वायरमन म्हणून काम करण्यासाठी आला होता. तेव्हापासून तो या तरुणीला ओळखत होता. तरुणीच्या आई मानसिक आजारी आहे. साळवे याने या गोष्टीचा गैरफायदा घेतला. आईला कोणीतरी भूतबाधा केली आहे. ती करणी भूतबाधा काढून या तरुणीच्या अंगात सोडावी लागेल अशा भूलभापा मारल्या. त्यानंतर तिच्या घरात हळदी कुंकाचे रिंगण करून त्यात त्याने या तरुणीला बसविले. उतारा जादूटोणा करून त्यांच्याकडून ५ हजार ५०० रुपये घेतले. त्यांच्या घरातून उतारा काढून या तरुणीला मांढरदेवी, काळुबाई या देवस्थानचे ठिकाणी २२ मार्चला घेऊन गेला. तेथे तिला हिरवे कपडे घालून सुवासिनी बनवून तिचे देवाशी म्हणजेच त्याच्याशी लग्न लावावे लागेल असे सांगितले. तेथे मी राजू साळवे याचेशी विवाह केला आहे. हा विवाह मांडाबाई, काळुबाई आणि धावजी पाटील यांचे साक्षीने केला आहे. आम्हाला आशीर्वाद द्यावा, असे लिहून घेतले.त्यानंतर तिच्याकडे शरीरसुखाची मागणी करुन तिचा वियनभंग केला. आई आजारातून बरी व्हावी, म्हणून तोपर्यंत तो सांगेल, त्यानुसार ही तरुणी वागत गेली. पण, त्याचा हेतू तिच्या लक्षात आल्यानंतर तिने खडक पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांना याची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संभाजी शिर्के व तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक गायकवाड व त्यांच्या सहका-यांनी राजू साळवे याला घरी जाऊन पकडले.पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केले. सरकारी वकील संजय दीक्षित यांनी न्यायालयात सांगितले की, आरोपीकडून ५ हजार ५०० रुपये हस्तगत करायचे आहेत. त्याने या तरुणीकडून लिहून घेतलेली चिठ्ठी व दीड हजार रुपये मिळाले आहेत. काळुबाईला जाण्यासाठी मित्राच्या रिक्षाचा वापर केला. त्याचा या गुन्ह्याशी काही संबंध आहे का याचा तपास करायचा आहे. त्याने आणखी काही महिलांना अशाप्रकारे फसविले आहे याचा तपास करायचा असल्याने पोलीस कोठडी आवश्यक असल्याचे सांगितले. न्यायालयाने त्याला १ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली.

टॅग्स :Arrestअटक