पुणे महापालिकेच्या अतिक्रमण निरीक्षकाला धक्काबुक्की करणारा अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2024 12:36 PM2024-02-16T12:36:30+5:302024-02-16T12:36:56+5:30

पुणे : हडपसर भागात अनधिकृत पथारी विक्रेत्यांविरुद्ध कारवाई करणाऱ्या महापालिकेच्या अतिक्रमण विभागातील निरीक्षकाला धक्काबुक्की करण्यात आल्याची घटना घडली. या ...

Arrested for pushing municipal encroachment inspector | पुणे महापालिकेच्या अतिक्रमण निरीक्षकाला धक्काबुक्की करणारा अटकेत

पुणे महापालिकेच्या अतिक्रमण निरीक्षकाला धक्काबुक्की करणारा अटकेत

पुणे : हडपसर भागात अनधिकृत पथारी विक्रेत्यांविरुद्ध कारवाई करणाऱ्या महापालिकेच्या अतिक्रमण विभागातील निरीक्षकाला धक्काबुक्की करण्यात आल्याची घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली.

ख्रिस्तोफर जाॅन नाईक (२६, रा. गोपाळपट्टी, मांजरी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबत महापालिकेच्या अतिक्रमण विभागातील निरीक्षकाने हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पुणे-सोलापूर रस्त्यावर हडपसर भागात नाईकने अनधिकृत पथारी थाटली होती. मोबाइल संचाला काच बसवणे तसेच अन्य वस्तूंची तो विक्री करत होता.

अतिक्रमण विभागाकडून कारवाई करण्यात आल्यानंतर नाईक हडपसर क्षेत्रीय कार्यालयात गेला. तेथे महापालिका निरीक्षकाला कार्यालयात शिवीगाळ करून धक्काबुक्की केली तसेच फाइल फेकून दिल्या. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी नाईकविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास सहायक पोलिस निरीक्षक डोंगरे करत आहेत.

Web Title: Arrested for pushing municipal encroachment inspector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.