आसखेड : ‘अटक करा; अन्यथा गोळ्या घाला, पण काम बंद करा, त्यानंतरच चर्चा करा, जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची, आमचे आधी पुनर्वसन करा अशा घोषणा देत संतप्त आंदोलकांनी भामा-आसखेड जलवाहिनीचे काम बंद पाडले. पोलिसांनी सावध पवित्रा घेत आंदोलकांची धरपकड करत काम पुन्हा सुरू केले. पॅकेज नाकारल्यानंतर तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा निष्फळ ठरल्यानंतर भामा-आसखेड प्रकल्पग्रस्थांनी सोमवारी जेल भरो आंदोलन करत जलवाहिनीचे काम बंद पाडले. पोलिसांनी आंदोलकांना अटक करत पुन्हा काम सुरू केले. करंजविहिरे, धामणेफाटा सगळ्या ठिकाणी नाकाबंदी करून आंदोलकांना पोलिसांनी थोपविले. त्यांना विविध गाड्यांमध्ये भरण्यात आले. चाकणच्या दिशेने घेण्यात निघालेल्या गाड्यांची दिशा अचानक बदलून परत फिरवल्याने गाड्या थांबवून आंदोलकांनी काम सुरू असलेल्या आसखेड फाट्याकडे पळ काढला. यामुळे पोलिसांची धांदल उडाली. आंदोलकांचा एक गट कामाच्या ठिकाणी पोहोचण्यात यशस्वी ठरला. त्यांनी काम बंद पाडले. परंतु दुसरा गट आल्यानंतर त्यांना पोलिसांनी अलीकडेच थोपवले. यामुळे जलवाहिनीचे काम पुन्हा सुरू करण्यात आले.
"अटक करा;अन्यथा गोळ्या घाला,पण काम बंद करा, त्यानंतरच चर्चा; भामा-आसखेड प्रकल्पग्रस्तांचा एल्गार"
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2020 11:57 IST
भामा-आसखेड जलवाहिनीचे काम पाडले बंद
अटक करा;अन्यथा गोळ्या घाला,पण काम बंद करा, त्यानंतरच चर्चा; भामा-आसखेड प्रकल्पग्रस्तांचा एल्गार
ठळक मुद्देपॅकेज नाकारल्यानंतर व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा निष्फळ; जेल भरो आंदोलन